नागपूर: नागपूर येथील रवी भवन परिसराचे दायित्व असलेल्या उप विभागीय अभियंत्यांच्या पदावर नेमका कोणता अधिकारी हा वाद उभा झाला आहे. येथील उप विभाग एकच्या अप विभागीय अभियंता पदावर संजय उपाध्ये यांनी मॅट अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडून आदेश आणून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे, वर्तमान उप विभागीय अभियंता अजय पाटील घाटे यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नुकतीच 30 ऑक्टोबर रोजी उप विभागीय अभियंता संजय उपाध्ये यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांचा चार्ज अजय पाटील घाटे यांनी लगोलग स्वीकारून कामाला सुरुवात देखील केली होती. या विरोधात संजय उपाध्ये यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने धाव घेतली आणि तडकाफडकी बसलीवर प्रश्न उपस्थित केले. त्यांना याच महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्ती मिळणार असल्याने एका महिन्यासाठी स्थानांतरण नको अशी भूमिका त्यांनी न्यायाधिकरणासमोर घेतली.
US Visa Rules : अमेरिकन सरकारने व्हिसाचे नियम का बदलले? भारतीय विद्यार्थी-कर्मचाऱ्यांना किती धोका?
तेथून सकारात्मक आदेश मिळाल्याने त्यांनी शनिवारी जाऊन कामाला सुरुवात देखील केली. आता, विद्यमान उप विभागीय अभियंता अजय पाटील घाटे यांचे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यांच्यापुढे संजय उपाध्ये यांची या महिन्याअखेर सेवानिवृत्ती होईपर्यंत स्वतः रजेवर जाण्याचा पर्याय केवळ शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.
नागपूर येथे 8 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार असल्याने कामांचा ताण वाढला आहे. कंत्राटदार संघटनेकडून देयके न मिळाल्याने काम बंद संपाचा फटका नकाराने आधीच कामाला बराच उशीर झाला आहे. अशातच नागपूरच्या रवी भवन येथील तीन बंगल्यांच्या नूतनीकरणासाठी प्रत्येकी एक कोटी पेक्षा जास्त रकमेचे एस्टिमेट्स करून बांधकाम सुरू केल्याप्रकरणी नागपूर पी डब्ल्यू डी आधीच चर्चेत आहे. अशात रवी भवन परिसराचे दायित्व असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभाग क्रमांक एक आता उप विभागीय अभियंत्यांच्या पदावरून वादामुळे देखील चर्चेत आले असल्याने PWD मधील वाद कधी संपणार हा प्रश्न विचारला जात आहे.
MHADA Houses: म्हाडाच्या घराच्या स्वप्नांचा चक्काचूर; कुटुंबाचे 37 लाख बुडाले, तुम्ही ही चूक करू नका
यापूर्वी, गेल्या वर्षी NDTV मराठी ने तत्कालीन मुख्य अभियंता दिनेश नंदनवार यांच्या कार्यालयातील लाईव्ह लाच प्रकरणाचा भांडाफोड केला होता. त्यामुळे राज्यभरात नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील टक्केवारीचा भ्रष्टाचार दृश्य स्वरूपात सार्वजनिक झाला होता. NDTV मराठी च्या बातमीची चक्क नागपूर खंडपीठाने दखल घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात कॅमेऱ्यासमोर लाच स्वीकारणाऱ्या क्लर्क चे निलंबन करणे भाग पडले होते.
अगदी अलीकडे नागपूर येथील सीताबर्डी परिसरात शहीद गोवारी उड्डाणपुलावर प्रवेश करताना कुठलीही सार्वजनिक घोषणा न करता दोन्ही बाजूला तब्बल चार महाकाय नियमबाह्य स्पीड ब्रेकर्स लावून कित्येक दुचाकीस्वारांचे अपघात घडवून आणले होते आणि नागपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय पुन्हा टीकेचे धनी ठरले होते. नंतर, NDTV मराठी ने ही प्रकरण उचलल्यानंतर त्यापैकी तीन स्पीड ब्रेकर्स तडकाफडकी हटविण्यात आले आहेत.