VIDEO: धक्का दिला.. चिमटा काढला अन् पाणी... नितीन गडकरींच्या कार्यक्रमात खुर्चीसाठी महिला अधिकाऱ्यांची जुंपली!

Nagpur Female Officer Fight VIDEO: हा वाद पोस्ट खात्यातील (Postal Department) दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये 'पोस्टमास्टर जनरल' (Postmaster General) या पदावरून सुरू झाला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये (Nagpur) आयोजित करण्यात आलेल्या एका सरकारी कार्यक्रमात दोन उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून आणि पदावरून झालेली 'धुसफूस' (Quarrel) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

हा वाद पोस्ट खात्यातील (Postal Department) दोन महिला अधिकाऱ्यांमध्ये 'पोस्टमास्टर जनरल' (Postmaster General) या पदावरून सुरू झाला. शोभा मधाळे यांची ८ सप्टेंबर रोजी कर्नाटक येथील धारवाड येथे बदली झाली होती. मधाळे यांच्या बदलीनंतर नागपूरचा प्रभार (Charge) नवी मुंबईच्या पोस्टमास्टर जनरल सुचिता जोशी यांच्याकडे देण्यात आला होता.

Pune Metro 2: पुणेकरांचा वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार? मेट्रो लाईनच्या विस्ताराचे टेंडर लवकरच

नेमकं काय घडलं? 

बदलीच्या या आदेशाविरुद्ध शोभा मधाळे यांनी न्यायालयात धाव घेतली आणि आपल्या बदलीवर स्थगिती (Stay) मिळवली. या न्यायालयीन लढाईमुळेच मधाळे आणि जोशी यांच्यात पदावरून 'शीतयुद्ध' सुरू होते. नेमका हाच वाद काल (शुक्रवारी) झालेल्या रोजगार मेळाव्यात (Rozgar Mela) सर्वांसमोर आला. कालच्या रोजगार मेळाव्यात पोस्टमास्टर जनरल निमंत्रित होत्या, त्यामुळे नियमानुसार सुचिता जोशी या मंचावर उपस्थित होत्या.

मात्र, बदलीवर स्थगिती मिळाल्यामुळे शोभा मधाळे या देखील कार्यक्रमात आल्या आणि एकाच सोफ्यावर (Sofa) दोघीही बसल्या. याच वेळी त्यांच्यात धुसफूस सुरू झाली. कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजनुसार, मधाळे यांनी जोशी यांच्या हाताला धक्का दिला, त्यामुळे सी.डी. (C.D.) वर पाणी सांडले. एवढेच नाही, तर मधाळे यांनी जोशी यांच्या डाव्या हाताला चिमटाही (Pinch) काढला. हा सगळा प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर घडला आणि तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Advertisement

नक्की वाचा- IKEA ची पुण्यात एन्ट्री; मोठी जागा भाड्याने घेतली; भाडं ऐकून थक्का व्हाल!)

दरम्यान, सरकारी कार्यक्रमात, विशेषतः केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी केलेले हे वर्तन अत्यंत गंभीर मानले जात आहे. त्यांच्या या वर्तणुकीमुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई (Disciplinary Action) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या हा व्हिडिओ माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे.