रेवती हिंगवे, पुणे
Pune Metro 2 Update: पुणे शहराच्या वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे मेट्रोच्या विस्तारित प्रकल्पाच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे. मेट्रो लाईन 2 च्या विस्तारित मार्गासाठीचे टेंडर महामेट्रोकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे. रामवाडी ते वाघोली आणि वनाझ ते चांदणी चौक या दोन विस्तारित प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर आता टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
विस्तारित मार्गाचा तपशील
पुणे मेट्रोचा विस्तारित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना 28.45 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन उपलब्ध होईल. ज्यावर एकूण 29 मेट्रो स्थानके असतील.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
रामवाडी ते वाघोली: हा मार्ग वाघोलीपर्यंत वाढणार असून, वाघोली हा भाग सध्या वाहतूक कोंडीचा हॉटस्पॉट आहे. या मार्गावर डबल फ्लायओव्हर देखील प्रस्तावित आहे. वाघोलीत आधीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना, या डबल फ्लायओव्हरच्या कामामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडणार असून, वाहतूक कोंडीचे चित्र भयंकर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रस्तावित स्टेशन्स: विमाननगर, सोमनाथ नगर, खराडी बायपास, तुळजा भवानी स्टेशन, उबाळे नगर, उप्पर खराडी नगर, वाघेश्वर मंदिर, वाघोली स्टेशन, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी स्टेशन.
(नक्की वाचा- IKEA ची पुण्यात एन्ट्री; मोठी जागा भाड्याने घेतली; भाडं ऐकून थक्का व्हाल!)
वनाझ ते चांदणी चौक : हा विस्तार पश्चिम पुणे भागातील महत्त्वाच्या केंद्रांना जोडेल. या मार्गावर कोथरुड बस स्थानक आणि चांदणी चौक स्टेशन असतील. महामेट्रोकडून टेंडर जारी झाल्यानंतर या दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world