Nagpur Crime: लक्झरी हॉटेलमध्ये पोलिसांची धाड, तरुण भयंकर अवस्थेत सापडले; नागपुरात सर्वात मोठी कारवाई

मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नखाते अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News:  नागपूरमधील पॉश भाग असलेल्या रामदासपेठ येथील एका अत्यंत नामांकित हॉटेलमध्ये उशिरा रात्री सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर सीताबर्डी पोलिसांनी धाड टाकली, ज्यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली. गोंदियाहून आलेल्या तीन तरुणांना हॉटेलच्या खोलीत एमडी (MD) ड्रग्सचे सेवन करताना रंगेहाथ पकडण्यात आले. घटनास्थळावरून एमडी पावडरही जप्त करण्यात आली आहे. मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नखाते अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने तिन्ही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

लक्झरी हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश! 

समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये ड्रग्सच्या विरोधात राबवल्या जात असलेल्या मोहिमेदरम्यान, सीताबर्डी पोलिसांना माहिती मिळाली की रामदासपेठ परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत काही तरुण एमडी ड्रग्सची पार्टी करत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी टीम तयार केली आणि दोन पंचांच्या उपस्थितीत हॉटेलवर अचानक धाड टाकली.

Advertisement

Pune News : सिया गोयलच्या वडिलांना तुकाराम मुंढेंचा दणका; प्रशासनाची मोठी कारवाई

खोलीचा दरवाजा उघडताच पोलिसांसमोर नशेचा खेळ उघड झाला. घटनास्थळावरून गोंदिया येथील रहिवासी मयंक अग्रवाल, पराग अग्रवाल आणि कुणाल नखाते यांना ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. चौकशीत धक्कादायक खुलासा झाला की, तिघांनी मिळून सुमारे २.५ ग्रॅम एमडी खरेदी केली होती, ज्यातील काही भाग त्यांनी सेवन केला होता.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तिन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांचे रक्त व लघवीचे नमुने न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) तपासणीसाठी पाठवले आहेत, जेणेकरून नशेच्या सेवनाची वैज्ञानिक पुष्टी होऊ शकेल. पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आणि न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

नक्की वाचा - Pune News : पुण्यातील घरांचं मार्केट बदलतंय; विक्रीत 15 टक्क्यांची घट तरीही बिल्डर टेन्शन फ्री, कारण काय?