Nagpur News: नागपुरात खासगी ट्रॅव्हल्सना नो एन्ट्री! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश बंद; कारण काय?

इनर रिंग रोड येथे उतरून मेट्रो किंवा सिटी बस किंवा प्रकल्प अन्य वाहतुकीच्या साधनांचा वापर या प्रवाशांना करावा लागणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

 नागपूर: नागपूर शहराच्या वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आता खासगी बसेसच्या प्रवाशांना थोडी कळ सोसावी लागणार आहे. येत्या 20 ऑगस्ट पासून त्यांना इनर रिंग रोड किंवा त्या पलिकडे पोहोचून खासगी बसेसमध्ये चढता येईल. त्याचप्रमाणे खासगी बसेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता शहरात ड्रॉप करता येणार नाही. इनर रिंग रोड येथे उतरून मेट्रो किंवा सिटी बस किंवा प्रकल्प अन्य वाहतुकीच्या साधनांचा वापर या प्रवाशांना करावा लागणार आहे. 

राज्यातील पुणे, छत्रपती संभाजी नगर आणि अन्य महानगरप्रमाणे नागपुरात देखील खासगी बसेस  शहराच्या बाहेरून ये जा करणार आहेत. नागपूर पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी नागपूरच्या वाहतूक कोंडीतील सर्वात मोठा सहभाग खासगी बसेसचा असतो त्यामुळे ही उपाय योजना केली गेल्याचे म्हटले आहे. 

Fastag Annual Pass : ज्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार नाही, तिथे काय? प्रवास करण्याआधी हे वाचा

नागपूर शहराच्या अंतर्गत रिंग रोड पेक्षा आत मध्ये सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत खाजगी बसेसना पार्किंग, ड्रॉप किंवा लिफ्ट ची परवानगी नसेल. प्रवाशांना इनर रिंग रोड वर किंवा त्यापलिकडे जाऊन खासगी बसेस मध्ये प्रवेश मिळवता येईल.

नागपुरातील वाहतुकीची कोंडी (ट्राफिक कन्जेशन) सोडविण्याकरिता नागपूर chya वाहतूक पोलिसांनी ही कठोर उपाययोजना घोषित केली आहे. पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी या निर्णयाचा बचाव केला आहे. इनर रिंग रोड वर खासगी बसेस करिता तात्पुरते हब निश्चित करण्यात येतील आणि याचा स्थायी उपाय बस टर्मिनल असेल असे सांगण्यात आले आहे.

Advertisement

नागपूर महानगर पालिका, नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी,  विविध शासकीय संस्था आणि प्रशासन मिळून या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू असून नागपूर भोवती विविध महामार्गांवर बस टर्मिनल सुरू करण्याचे दिशेने प्रयत्न होणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले आहे.

Mumbai News : मातीचा ढिगारा झोपडीवर कोसळला; झोपेत असतानाच दोघांचा मृत्यू, विक्रोळीतील घटना