जाहिरात

Fastag Annual Pass : ज्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार नाही, तिथे काय? प्रवास करण्याआधी हे वाचा 

Toll Fastag Annual Pass: पेमेंट केल्यानंतर, साधारणपणे दोन तासांत तुमचा पास ॲक्टिव्हेट होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा पास तुमच्या जुन्या FASTag स्टिकरवरच ॲक्टिव्हेट होईल, त्यामुळे तुम्हाला नवीन FASTag घेण्याची आवश्यकता नाही

Fastag Annual Pass : ज्या टोल नाक्यांवर वार्षिक पास चालणार नाही, तिथे काय? प्रवास करण्याआधी हे वाचा 
  • फास्टैग का सालाना पास एनएचएआई वेबसाइट या राजमार्ग यात्रा ऐप से एक्टिव कर सकते हैं
  • सालाना पास एक्टिवेशन के लिए फास्टैग वेरिफिकेशन और तीन हजार रुपये की पेमेंट जरूरी है
  • फास्टैग पास नेशनल हाईवे और नेशनल एक्सप्रेसवे पर मान्य होगा, स्टेट हाईवे पर यह काम नहीं करेगा
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

टोल टॅक्स भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या FASTag वर आता वार्षिक पासची सुविधा सुरू झाली आहे. 15 ऑगस्टपासून नागरिक आपला वार्षिक पास काढू शकतात. या नवीन सुविधेमुळे नियमित प्रवास करणाऱ्या लोकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हा पास कुठे काम करेल आणि कुठे नाही, याबाबत काही लोकांमध्ये संभ्रम आहे. 

FASTag पास कसा बनवायचा?

हा पास बनवण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या वेबसाइटवर किंवा 'राजमार्ग यात्रा' या मोबाइल ॲपचा वापर करून तुमचा पास ॲक्टिव्हेट करू शकता. यासाठी, तुम्हाला आधी FASTag व्हेरिफिकेशन करावे लागेल आणि त्यानंतर 3000 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर, साधारणपणे दोन तासांत तुमचा पास ॲक्टिव्हेट होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हा पास तुमच्या जुन्या FASTag स्टिकरवरच ॲक्टिव्हेट होईल, त्यामुळे तुम्हाला नवीन FASTag घेण्याची आवश्यकता नाही.

(नक्की वाचा-  Toll Fastag Annual Pass: फास्टटॅगचा वार्षिक पास देशभर लागू! काय होणार फायदा? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं)

टोल टॅक्स कसा कापला जाईल?

हा पास सर्वच ठिकाणी काम करणार नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग (National Highway) आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवे (National Expressway) वरच हा पास वैध असेल. राज्याचे महामार्ग किंवा राज्याच्या एक्सप्रेसवेवर हा पास काम करणार नाही.

ज्या टोल प्लाझावर FASTag पास काम करणार नाही, तिथे तुमच्या FASTag मधील नियमित बॅलन्स (Balance) कापला जाईल. त्यामुळे, अशा रस्त्यांवर वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या FASTag मध्ये काही रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

(नक्की वाचा : FASTag Annual Pass: महाराष्ट्रात कुठे कुठे चालणार फास्टॅग वार्षिक पास? वाचा 'त्या' 96 टोलनाक्यांची यादी )

200 ट्रिप किंवा 1 वर्षाची वैधता

जर तुम्ही तुमच्या FASTag स्टिकरवर वार्षिक पास ॲक्टिव्हेट केला, तर तुम्हाला 200 ट्रिप किंवा 1 वर्षापर्यंतची मोफत यात्रा मिळेल. एकदा टोल प्लाझा पार केल्यावर तुमची एक ट्रिप मोजली जाईल, तर येण्या-जाण्याच्या फेरीवर दोन ट्रिप्स मोजल्या जातील. सतत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा पास खूप फायदेशीर आहे. या पासमुळे अशा लोकांची वार्षिक सुमारे 5000 ते 7000 पर्यंत बचत होऊ शकते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com