जाहिरात

Nagpur News: दोन भावांचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह, एकाचे दोन्ही हात, दुसऱ्याचं शीर धडावेगळं, नागपूर हादरलं!

घटना इतकी भयंकर होती की एकाचे दोन्ही हात तुटून पडले, तर दुसऱ्याचे शीर धडावेगळं झाले. छिन्नविछिन्न झालेले ते मृतदेह पाहून प्रत्यक्षदर्शींच्याही  काळजाचा ठोका चुकला.

Nagpur News: दोन भावांचे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह, एकाचे दोन्ही हात, दुसऱ्याचं शीर धडावेगळं, नागपूर हादरलं!

Nagpur Train Accident News:  नागपूर जिल्ह्यातील सावनेरमधून एका भीषण दुर्घटनेची बातमी समोर आली आहे. गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर ट्रेनच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिकेचा 65 लाखांचा 'गुवाहाटी पॅटर्न' चर्चेत, नेमकं प्रकरण काय?

दोन सख्ख्या भावांचा भयंकर अंत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी सकाळी १० वाजून १५ मिनिटांच्या सुमारास सावनेर येथे रेल्वे रुळावर ट्रेनच्या धडकेत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निरंजन लक्ष्मण फिरके (वय, ४०) आणि वर्षीय योगेश लक्ष्मण फिरके (वय, ३७) अशी दोन्ही भावांची नावे आहेत. दोघेही सावनेर येथील रहिवासी असलेल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना इतकी भयंकर होती की एकाचे दोन्ही हात तुटून पडले, तर दुसऱ्याचे शीर धडावेगळं झाले. छिन्नविछिन्न झालेले ते मृतदेह पाहून प्रत्यक्षदर्शींच्याही  काळजाचा ठोका चुकला. याबाबतची माहिती अंकित हांडे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली. त्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना याची माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच सावनेर पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले. सध्या हा अपघात कसा घडला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सावनेर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धक्का! 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार, थेट मंत्र्यांकडे तक्रार,नेमक्या मागण्या काय?

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com