Maharashtra Politics: अजित पवार गट रेशीमबागेत का जात नाही? कधीपासून सुरु झाली प्रथा? वाचा...

बातमी झाली ती यावेळी देखील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार सहभागी झाले नाहीत, याची. मात्र, त्याआधी या प्रथेविषयी जाणून घेऊ.

जाहिरात
Read Time: 3 mins

Maharashtra Winter Session 2025: नागपुरात रविवारी दुपारी महाराष्ट्र विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले. मात्र, त्याच सकाळी पावणे आठ वाजे पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या रेशिमबाग येथील डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात वर्दळ दिसून आली.  दरवर्षीप्रमाणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप आणि शिवसेनेचे विधिमंडळातील शंभरावर आमदार तिथे उपस्थित झाले. त्यांनी डॉ हेडगेवार यांच्या प्रतिमेसमोर श्रद्धा सुमने अर्पित केली, गोळवलकर गुरुजींच्या समाधीपुढे नतमस्तक झाले. 

माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित संघटन आहे, तर शिवसेनाही प्रखर हिंदुत्वाचा विचार मांडणारा पक्ष असल्याचे सांगितले. मात्र, या निमित्ताने बातमी झाली ती यावेळी देखील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार सहभागी झाले नाहीत, याची. मात्र, त्याआधी या प्रथेविषयी जाणून घेऊ.

Madha News: राष्ट्रवादीच्या नेत्यावर काळे ऑईल ओतले, टेंभुर्णीत मोठा तणाव, घडलं काय?

अजित पवार गट रेशीमबागेत का जात नाही?

महाराष्ट्राची दुसरी राजधानी असलेल्या नागपूर येथे महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार पक्षाचे वैचारिक मूळ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशिमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात भेट देतात हा जुना शिरस्ता आहे. फार पूर्वी भारतीय जनता पक्षाचे आमदार आपल्या सोयीच्या वेळेने जाऊन आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार आणि श्री गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाला जाऊन नमन करून येत.  विधान सभेत भाजपचे आमदार वाढले आणि सारे एकत्र जाऊ लागले तेव्हा ही बाब अधिक सार्वजनिक झाली.  

1995 नंतर म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून याची दरवर्षी हिवाळी अधिवेशनात बातमी होऊ लागली. 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी या प्रथेला सुनियोजित, आखीव स्वरूप दिले. ठराविक दिवशी, ठराविक वेळी भाजपचे आमदार तिथे पोहोचू लागले आणि साहजिकच कोण आले, किती वाजता आले, कोण पोहोचू शकले नाही, अशा बाबींचा देखील उहापोह माध्यमांकडून सुरू झाला. वाहिन्यांवर बातमीचे थेट प्रक्षेपण सुरू झाले. 

Advertisement

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर देखील एक बदल पहायला मिळाला. 29 डिसेंबर 2022 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रेशिमबाग येथील स्मृती मंदिरात आले तेव्हा त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे होते. यावर उद्धव ठाकरेंच्या गटातून त्यावर टीका देखील झाली, आणि आयडॉलोजी बदलली की काय, वगैरे आरोप झाले. त्यावर आमची हिंदुत्वाची नाळ एकच अशा आशयाचे उत्तर शिंदे यांच्या पक्षातून आले होते.

VIDEO: माणूसकी जिवंत आहे! 2025 मधील 5 हृदयस्पर्शी प्रसंग, मीडिया जगताचे वेधलेलं लक्ष

2024 मध्ये निवडणुकांनंतर महायुतीचे सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि तेव्हादेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार भाजप आमदारांच्या सोबतीला रेशीमबागेत दिसले. मात्र, अर्थातच त्यावेळी देखील महायुती सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तिथे उपस्थित नव्हते.

Advertisement

महायुतीमध्ये येण्याआधीच स्पष्ट भूमिका!

याच वर्षी 19 सप्टेंबर 2025 रोजी नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी चिंतन शिबिर झाले, त्यावेळी अजित पवारांच्या अध्यक्षीय भाषणात याचे कारण सापडते. अजित पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या आपल्या निर्णयावर बोलताना त्यावेळी एक आठवण सांगितली होती. "मी आणि प्रफुल्ल पटेल आम्ही निर्णय घेण्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा मोदी, शाह आणि नड्डाजी यांना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांना सांगितले होते की हा शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे." "शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर हा जसा देशाच्या लोकशाहीचा आत्मा आहे तसाच तो आपल्या पक्षाचा आत्मा आहे. आम्ही खूप विचार करून एन डी ए मध्ये सामील झालो आहोत."

यावर नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर संघाविषयी एक ज्येष्ठ विचारक NDTV मराठी सोबत बोलताना म्हणाले, "निश्चितच, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आयडियोलॉजी आणि वोट बँक ही कारणे वाटत असावीत तसे ते म्हणाले असावेत. मात्र, संघ त्या विचारांपेक्षा काही वेगळे सांगत नाही. भारतात राहणारे सर्व नागरिक हिंदू आहेत. यातच सारे आले. याचा विसर पडू नये, म्हणजे झाले.

Advertisement