संकेत कुलकर्णी, पंढरपूर:
Madha News: माढ्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माढ्यातील टेंभुर्णी येथे राष्ट्रवादीच्या नेत्याला काळे ऑईल फासल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापुरुषांचा अपमान केल्याचा निषेध म्हणून हे कृत्य करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तात्काळ आक्रमक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माढ्यातील राष्ट्रवादीचे नेते भारत पाटील यांच्यावर काही शिवप्रेमींनी काळे ऑइल ओतल्याचा प्रकार घडला आहे. माढ्यातील टेंभुर्णी येथे हा प्रकार घडला. महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याने संताप व्यक्त करत भारत पाटील यांना काळे फासण्यात आले. दोन दिवसांपूर्वी टेंभुर्णीमध्ये झालेल्या मोर्चात भारत पाटील यांच्याकडून महापुरुषांचा एकेरी उल्लेख झाला होता.
VIDEO: माणूसकी जिवंत आहे! 2025 मधील 5 हृदयस्पर्शी प्रसंग, मीडिया जगताचे वेधलेलं लक्ष
याचाच निषेध म्हणून ही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पाटील यांच्यावर काळे ऑइल फेकण्याची घटना घडली आहे. त्यानंतर तात्काळ संबंधित कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आक्रमक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. सध्या टेंभुर्णी पोलीस ठाणे परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world