5 Heart Touching viral videos from 2025: 2025 हे वर्ष अपघात, दुर्घटना अन् भयंकर हत्याकांडाच्या घटनांनी प्रचंड गाजले. इंदोरमधील राजा रघुवंशी और सोनम रघुवंशी प्रकरण, मेरठमधील मुस्कान आणि साहिल प्रकरणाने संपूर्ण देश हादरुन गेल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे वर्षभरात अनेक क्रुर घटनांनी खळबळ उडाली असतानाच असे काही प्रसंग घडले ज्याने माणूसकीचे दर्शन घडवले. जाणून घ्या 2025 मधील असेच काही खास प्रसंग ज्याने नेटकऱ्यांची मने जिंकली.
वृद्धासाठी महिलेने सीट दिली अन्..
एप्रिलमध्ये, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ज्यामध्ये एका महिलेने गर्दीच्या बसमध्ये एका वृद्ध पुरूषाला तिची सीट दिली. वृद्ध पुरूषाने हसून तिचे आभार मानले आणि संभाषणादरम्यान सांगितले की तो चार दिवसांपासून कोणाशीही बोलला नाही. हे ऐकून ती महिला खूप भावूक झाली. ही कहाणी वाचल्यानंतर, लोकांनी भरभरुन कमेंट्स दिल्या अन् महिलेचे कौतुक केले.
I Gave Up My Seat to an Elderly Man on the Bus ,What He Said to Me Afterwards Made Me Think a Lot.
byu/moamen12323 inself
फोनवरील बोलणे ऐकून कॅब ड्रायव्हरने दाखवली माणूसकी
नोव्हेंबरमध्ये कंटेंट क्रिएटर योगिता राठोड या तरुणीने एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने सांगितले की, ती फोनवर बोलत असताना तिने सांगितले की खूप तासाच्या शूटिंगनंतर खूप थकली होती आणि दिवसभर काहीही खाल्ले नव्हते. कॅब ड्रायव्हरने तिचे हे बोलणे ऐकले आणि तिला सँडविच आणण्यासाठी वाटेत थांबला. तो म्हणाला की जर त्याची बहीण भूक लागली असती तर तोही असेच केले असते. या क्षणाने सोशल मीडियावर लोकांना भावूक केले.
सराफ व्यापाराचा दिलदारपणा...
जूनमध्ये, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दागिन्यांच्या दुकानातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. ९३ वर्षीय पुरूष आपल्या पत्नीसाठी मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी गेला होता. त्याच्या या कृतीने प्रभावित होऊन दुकानदाराने त्याला टोकन म्हणून फक्त २० रुपयांना मंगळसूत्र दिले. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हिडिओचेही भरभरुन कौतुक केले.
डिलिव्हरी बॉयचा माफीनामा..
सप्टेंबरमध्ये, एका महिलेने रात्री ऑर्डर दिल्याबद्दल डिलिव्हरी बॉयने माफी मागितल्याचे सांगितले. त्याच्या प्रामाणिक माफीने तिचा राग लगेचच दूर केला. ही पोस्ट व्हायरल झाली आणि लोकांनी अशी टिप्पणी केली की फार कमी लोकांमध्ये माफी मागण्याची हिंमत असते.
सिक्कीमधील गोड मुलगा..
२०२५ च्या सुरुवातीला, सिक्कीममधील एका छोट्या गावातून एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका मुलाने पर्यटकांशी गप्पा मारल्या आणि कोणताही दिखावा न करता त्यांना मिठाई देण्यासाठी धाव घेतली. त्याच्या निरागसतेने मने जिंकली आणि सोशल मीडियाने टिप्पणी केली की या मुलाकडून आपल्या सर्वांना खूप काही शिकायचे आहे. २०२५ मधील हे व्हायरल क्षण आपल्याला आठवण करून देतात की मानवतेला मोठ्या व्यासपीठाची आवश्यकता नाही. लहान चांगली कृत्ये, योग्य वेळी केलेले वर्तन आणि खऱ्या भावना ही हृदये जोडतात आणि जग थोडे चांगले बनवतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world