मनोज सातवी, प्रतिनिधी:
Nalasopara Health Scheme Scam: रुग्णांच्या उपचारांच्या नावाखाली बनावट कागदपत्रांचा खेळ रचून विमा कंपनीला लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात उघडकीस आला आहे. तब्बल १७ विमा दाव्यांमध्ये गंभीर विसंगती आढळल्यानंतर दोन डॉक्टरांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे आरोग्य विमा दाव्यांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Saving Tips VIDEO: पैशाची होणार बचतच बचत! 80/20 चा खास फॉर्म्युला... दिल्लीतील तरुणीची भन्नाट आयडिया
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नालासोपारा पूर्व येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये बनावट वैद्यकीय कागदपत्रे, तपासणी अहवाल आणि कथित खोट्या उपचार नोंदींच्या आधारे बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीची ₹10 लाख 21 हजार 920 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी डॉ. इमरान खान, डॉ. गौरव शर्मा, पूजा खान आणि रजनोश सिंग यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बजाज जनरल इन्शुरन्सचे ब्रँच ऑपरेशन्स अँड सर्व्हिस मॅनेजर चेतन चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जून २०२६ मध्ये कंपनीच्या तपास पथकाने २०२४ ते २०२६ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या आरोग्य विमा दाव्यांचे ऑडिट केले. त्यावेळी १७ रुग्णांच्या उपचारांमध्ये गंभीर विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला. तक्रारीनुसार, संबंधित डॉक्टरांनी काही रुग्णांवर उपचार केल्याचे नाकारले असून, रक्त व लघवी तपासणी अहवालांवरील स्वाक्षऱ्यांमध्येही तफावत आढळली.
या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडून लाखो रुपयांचे क्लेम मंजूर करून घेण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विमा क्षेत्रातील गैरव्यवहार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे प्रामाणिक पॉलिसीधारकांनाही त्याचा फटका बसत असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पेल्हार पोलीस करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कांबळे यांनी दिली आहे.
How to Get Rid of Frogs:पावसामुळे घरात बेडूक येतोय? न मारता 'असे' दूर पळवा; 'या' वासाने होतील गायब!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world