Auto Rikshaw Stunt Video Viral : धोकादायक रील्स बनवून ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचं वेड अनेकांना लागलं आहे. मागील काही दिवसांपासून जीवघेण्या स्टंटबाजीचे व्हिडीओ समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही लोक जीव धोक्यात टाकून वाहनांची स्टंटबाजी करतात. हिरोगिरी करण्यात व्यग्र असलेल्या या लोकांना जीवाला धोका निर्माण होईल,याचं अजिबात भान राहिलेलं नाहीय.असाच काहीसा धक्कादायक प्रकार नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्र किनारी घडला आहे.
समुद्र किनारी रिक्षा गोल गोल फिरवली अन् जे घडलं..
मिळालेल्या माहितीनुसार,एका रिक्षा चालकाने रील बनवण्यासाठी नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्र किनारी रिक्षा गोल गोल फरवून धोकादायक स्टंटबाजी केल्याचं समोर आलं आहे. रिक्षाचालकाच्या जीवघेण्या स्टंटबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नक्की वाचा >> Pune News: भीमाशंकर मंदिर कधीपर्यंत बंद राहणार? पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी आता दिली मोठी अपडेट
इथे पाहा रिक्षा चालकाचा व्हायरल व्हिडीओ
— Naresh Shende (@NareshShen87640) May 31, 2026
रिक्षा समुद्र किनारी गोल गोल फिरवून हा चालक स्टंटबाजीचा व्हिडीओ शूट करत होता.परंतु,स्टंटबाजी करताना रिक्षाच पलटी झाली अन् चालकाची चांगलीच फजिती झाली.सुदैवाने या अपघातात रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही.अशा स्टंटबाजीमुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी अशा चालकांविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नक्की वाचा >> Solapur News : रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर पती निलेश पहिल्यांदाच झाला व्यक्त; नेटकरी मात्र संतापले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world