Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दे धक्का! तब्बल 92,00,000 नावे वगळली; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक संख्या?

महिन्यांपूर्वीच सरकारने ई केवायसी प्रक्रिया केली नसल्याने 80 लाख नावे वगळण्यात आल्याचे जाहीर केले होते, आता ही संख्या 92 लाखांवर गेली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Ladki Bahin Yojana:  महाराष्ट्र सरकारची बहुचर्चित योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत एक मोठी अन् महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वीच सरकारने ई केवायसी प्रक्रिया केली नसल्याने 80 लाख नावे वगळण्यात आल्याचे जाहीर केले होते, आता ही संख्या 92 लाखांवर गेली आहे.

92,00,000 लाखांपेक्षा जास्त नावे वगळली

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, माझी लाडकी बहीण योजनेचे मूळ लाभार्थी संख्या २.४ कोटी होती, त्या तुलनेत ही घट सुमारे ३८ टक्के आहे. केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही घट झालेली नाही तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. सुमारे ५० ते ५५ लाख महिला मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. तर १२ लाख महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते.

Advertisement

Marathwada News: मराठवाड्यावर नवं संकट! पेरणीचा कालावधी संपला; तब्बल 36 टक्क्यांनी पेरणी घसरली

अधिकाऱ्यांच्या मते, लाभार्थ्यांच्या संख्येत झालेली घट केवळ प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे नाही. यामागे पात्रतेचे निकष पूर्ण न करणे यासह विविध कारणे आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, अंदाजे ५० ते ५५ लाख महिला विहित मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत. अंदाजे १२ लाख महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेच्या निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. ४५ लाखांहून अधिक महिलांनी ६५ वर्षांची वयोमर्यादा ओलांडली होती. काही पुरुषांनी (अंदाजे १४,०००) महिला असल्याचे भासवून या योजनेचा गैरफायदा घेतला होता, परंतु त्यांना वगळण्यात आले आहे.

 बीड जिल्ह्यातून सर्वाधिक नावे वगळली! 

सर्वाधिक २.८ लाख महिलांची नावे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून वगळण्यात आली आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सरकारने लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अंदाजे आठ महिन्यांचा कालावधी दिला होता. या काळात अनेक महिला प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, परिणामी अंदाजे ५.५ लाख नावे वगळण्यात आली. ₹२.५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अंदाजे १२ लाख महिला आयकरदात्या असल्याचे आढळून आले. ४.५ लाखांहून अधिक महिला ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. जवळपास ५ लाख महिला नमो शेतकरी योजनेचा आधीच लाभ घेत होत्या.

Wari 2026: 80 वर्षांपासूनचा सेवा यज्ञ! 4 पिढ्यांची परंपरा; वारकऱ्यांसाठी दशरथ कुटुंबियांचा मायेचा घास