काँग्रेसचं ठरलं! दारुण पराभवानंतर घेतला मोठा निर्णय; नवी घोषणा काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत आगामी काळात ईव्हीएम मशिनविरोधात मोहिम उघडणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

जुई जाधव, मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत महायुतीने पुन्हा एकदा सत्तेवर दावा केला आहे. महायुतीच्या या लाटेमध्ये महाविकास आघाडीसह काँग्रेसचा धुव्वा उडाला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर असे काँग्रेसचे अनेक दिग्गज पराभूत झाले. 

विधानसभा निवडणुकीच्या या धक्कादायक निकालानंतर आता ईव्हीएम मशिनबाबत शंका उपस्थित केली जात आहे. कोणतीही लाट नसताना महायुतीला पाशवी बहुमत कसे मिळाले, असा सवाल आता काँग्रेस नेते उपस्थित करत आहेत. अशातच आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत आगामी काळात ईव्हीएम मशिनविरोधात मोहिम उघडणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.  

नक्की वाचा: शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार

काय म्हणाले नाना पटोले? 

'बहुमत मिळून सुद्धा कोणाला मुख्यमंत्री बनवायचे अजूनही ठरलेले नाही. महाराष्ट्रचा शेतकरी अजूनही आस लावून बसलेला आहे.  बहुमत होऊन सुद्धा कायदा सुव्यवस्था सुधारेल असं वाटलेले. महाराष्ट्र बिघडवण्यासाठी अजून किती वेळ घालवणार आहेत. आम्ही मत दिलं नाही तरी सरकार कसं आलं हे मत लोकांचं आहे'

'आम्हाला आता बॅलेटवर निवडणूका हव्या आहेत अशी भूमिका खर्गे यांनी घेतली. भारत जोडो यात्रा जशी केली तशीच यात्रा आता करणार आहोत.  आमचं मत वाया जात आहे, अशी भावना आता लोकांच्या मनात आहे.  आम्ही निर्धार केला आहे, दोन दिवसात महाराष्ट्रामध्ये लोकांची एक सही घेण्याची मोहीम घेणार आहोत,' अशी महत्वाची घोषण नाना पटोलेंनी केली. 

 'देशातील महत्वाच्या व्यक्ती त्यांना हे सह्यांचे निवेदन देणार आहोत. जेव्हा राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रामध्ये येईल तेव्हा हिरीरीच वातावरण निर्माण करू. लोकशाही वाचवण हे महत्वाचे झालं आहे. उच्च न्यायालयाने जो निर्णया दिला तो राजकीय निर्णय होता.या मताचा वापर करत यावा यासाठी आम्ही ही भूमिका घेणार आहोत,' असेही ते म्हणाले.

महत्वाची बातमी: भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंचं नाव चर्चेत? काय आहे कारण?