नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का, सीट गमावली; 5 महिन्यात नेमकं काय घडलं?

विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा धक्का.

जाहिरात
Read Time: 2 mins
नांदेड:

विधानसभा निवडणुकीनंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेडमधून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. मात्र अवघ्या तीन महिन्यात त्यांचं आजारपणात निधन झालं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. 

Advertisement

नक्की वाचा - Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : महायुती की मविआ, BMC च्या सेमीफायनलमध्ये कोण सरस?

मात्र या पोटनिवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून वसंतराव चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपकडून संतुकराव हंबर्डे निवडणुकीच्या रिंगणात होते. यात हंबर्डे तब्बल 37,810 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 5,50,585 मतं मिळाली असून रवींद्र चव्हाण यांना 5,12,775 मतांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र तीन महिन्यांपूर्वी ज्या जागेवरुन काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. त्याच जागेवरुन अवघ्या तीन महिन्यात काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या तीन महिन्यात असं काय घडलं असा सवाल उपस्थित केला जात आहे. या जागेवरुन वसंतराव चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळे येथून सहानुभूतीचाही काहीच फायदा झाला नसल्याचं दिसून येत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​ठाकूरांच्या वर्चस्वाला हादरा, पिता-पुत्राला भाजप उमेदवारांनी दिला दणका

राज्यभरात महायुतीने केलेला लाडकी बहीण योजनेचा प्रचार, महिलांना एसटीमधील सवलत आदी योजनांचा येथेही परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय नांदेडचे एकेकाळचे काँग्रेसचे नेतृत्व सांभाळणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये सामील झाल्यामुळे नांदेडमध्ये विधानसभेबरोबरच लोकसभेतही फायदा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Advertisement