Nanded News: पाटलाशी सोयरीक करायची लायकी आहे का? एका धमकीने सगळं संपलं; प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या

nanded News: याप्रकरणी मुलीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नांदेड: प्रेमप्रकरणातून बेदम मारहाण झाल्यानंतर आणि मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या धमकीनंतर बदनामीच्या भितीने 19 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना नांदेड शहरातील सुगाव येथे घडली आहे. याप्रकरणी मुलीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आमच्या मुलीसोबत प्रेम करण्याची तुझी लायकी नाही असे म्हणत मुलीच्या घरच्यांनी  तरुणास मारहाण केल्याने एका 19 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लिंबगाव पोलिस स्थानकाच्या अंतर्गत घडली आहे. नितीन शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने प्रेयसीला पाठवलेल मेसेज आणि मुलीच्या चुलत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉलही व्हायरल झाला आहे.

मयत नितीन याचे थुगाव येथील एका तरुणीसोबत प्रेम होते. दोघेही एकाच जातीचे होते पण तरुणीच्या घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते. काही दिवसांपूर्वीच मुलीच्या पालकांनी त्याला गावकऱ्यांसमोरच बेदम मारहाण करत त्याची धिंड काढली होती. त्यानंतर त्याला फोन करुन धमकी देण्यात आली. आम्ही देशमुख आहे, तुझी लायकी आहे का पाटलांशी सोयरिक करायची, अशी धमकी त्याला देण्यात आली. 

(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)

त्यानंतर नितीन शिंदे या तरुणाने शेतात जाऊन गळफास घेत आपले आयुष्य संपवले. मृत्यूआधी त्याने प्रेयसीला चिठ्ठीही लिहली, ज्यामध्ये त्याने मला माफ कर, मी तुझी साथ देऊ शकलो नाही. तु काळजी करु नकोस, तुझं चांगलं होईल, मला माफ कर.. मोठ्या घरची मुलगी मोठ्याच घरात जाते. मी नाही राहिलो तर तु खुश राहशील. माझ्या घरचेही कधी तुला बोलणार नाहीत. पुढच्या जन्मात नक्कीच देशमुख होतो, असा मजकूर त्याने लिहला आहे. 

Advertisement

दरम्यान, नितीन शिंदे हा आई- वडिलांना एकुलता एक होता. त्याच्या मृत्यूने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमच्या आधाराची काठी हरवली, आम्ही कसं जगायचं? आमच्या मुलाने जशी फाशी घेतली तशीच त्यांनाही फाशी व्हावी.. अशी मागणी त्यांनी केली आहे.