Nandurbar News: राजकीय वाद..! शिंदे गटाच्या माजी आमदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत मोठे नुकसान

रात्री उशिरापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार:

Nandurbar News: नंदुरबार नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिंदेंची शिवसेनेचे नगरसेवक प्रथमेश चौधरी यांची निवड झाली आहे. पालिकेत शनिवारी उपनगराध्यक्ष पदासाठी विशेष सभा घेण्यात अली, या मतदान प्रकियेत प्रथमेश चौधरी यांनी ३० मतांनी विजय मिळवला. या निवडीनंतर झालेल्या किरकोळ वादानंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. 

शिरीष चौधरी यांच्या घरावर हल्ला

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. नंदुरबार नगर परिषदेवर माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश चौधरी यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. यावेळी झालेल्या किरकोळ वादानंतर रात्रीच्या वेळेस अज्ञातांनी घरावर दगडफेक केली. 

घरावर झालेल्या दगडफेकीत खिडक्यांच्या काचांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून  गाडीही जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दगडफेकीनंतर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

BMC Election 2026: मुंबईत ठाकरेंना जय महाराष्ट्र! शिवडीतील बडा नेता करणार शिंदेंच्या पक्षात प्रवेश

3 स्वीकृत नगरसेवकांना संधी

दरम्यान, नुकत्याच झालेल्या नंदुरबार नगर परिषद निवडणुकीत शिंदेंची शिवसेनेचे पाच पैकी चार मुस्लिम उमेदवारांचे पराभव झाले होते या चारही जागांवर एमआयएम पक्षाने विजय मिळवला होता मात्र आज शिंदेंच्या शिवसेनेकडून 3 स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळाली आहे. याच्यात मुस्लिम चेहरा म्हणून माजी उपनगराध्यक्ष हाजी परवेज खान यांना संधी देण्यात आली आहे, हाजी परवेज खान हे शिंदेंची शिवसेने कडून मुस्लिम समाजातील प्रमुख चेहरा असून मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी परवेज खान यांना संधी देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Raj Thackeray : तो प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, NDTV मराठीच्या मुलाखतीत राज ठाकरे असं का म्हणाले, पाहा VIDEO )