प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अनेक शहरांमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. या कुत्र्यांच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणेही मुश्कील झाले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. नंदुरबार जिल्ह्यातही मोकाट कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळत असून ७ महिन्यांत १ हजार ७४५ पेक्षा अधिक जणांचे लचके तोडल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात डॉग बाइटच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै या ७ महिन्यांमध्ये जिल्ह्यात १ हजार ७४५ पेक्षा अधिक नागरिकांना कुत्रा चावल्यामुळे त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्याची नोंद आहे. या आकडेवारीनुसार रोज सरासरी २ जनंपेक्षा अधिक नागरिक डॉग बाइटचे शिकार होत आहेत.
Mumbai Metro : मुंबईकरांच्या संतापाचा उद्रेक, ऐन गर्दीत रोखली मेट्रो, पाहा Video
जिल्हाभरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला होण्याची भीती बळावली आहे. शहरातील अनेक रस्त्यावर कुत्र्यांचे झुंड दिसून येतात. रात्रीच्या वेळी एक नव्हे, तर अनेक कुत्रे वाहनावर धावून येतात. त्यामुळे वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील बोरनार शिवारात वन्य प्राण्यांनी शेतांमध्ये धुडगूस घातल्याने मक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मक्याला कणसे लागायला सुरुवात झाल्याने वन्यजीवांनी मक्याच्या पिकाकडे आपला मोर्चा वळवला असून मक्याच्या शेतात वन्यजीव उच्छाद करत असल्याने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे वन विभागाने तातडीने वन्यजीवांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.