'आमच्या धर्माच्या आड येऊ नका...', जैन नेत्याने सुनावलं, संदीप देशपांडेंनीही खडसावलं, कॉल रेकॉर्डिंग VIRAL

मराठी आणि जैन बांधव या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे गुणागोविंदाने राहत आहेत. पण काही राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार:

Jain Community Controversy: मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या मारण्याच्या कारणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्याला आता भाषिक आणि धार्मिक वळण लागताना दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जैन समाजाबाबत सांस्कृतिक दहशतवाद असा शब्दप्रयोग केल्याने जैन समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर जैन समाजाचे युवा नेते कुणाल जैन यांनी थेट संदीप देशपांडे यांना फोन लावून त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आणि मर्यादा ओलांडू नका असा जाहीर इशारा दिला.

Ahilyanagar News: श्रीरामपुरात प्रसूतीवेळी महिलेचा मृत्यू,नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक, डॉक्टरविरोधात ठिय्या

जैन नेत्याचा मनसेला इशारा 

नंदुरबार जिल्ह्यातील कुणाल जैन आणि संदीप देशपांडे यांच्यात झालेल्या फोन कॉलमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. कुणाल जैन यांनी देशपांडे यांना सुनावले की, मराठी आणि जैन बांधव या महाराष्ट्रात वर्षानुवर्षे गुणागोविंदाने राहत आहेत. पण काही राजकारणी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Advertisement

संदीप देशपांडे यांनी जैन समाजावर सांस्कृतिक दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप केला होता. यावर आक्षेप घेत कुणाल जैन यांनी विचारले, तुम्ही जैन समाजासाठी दहशतवादी हा शब्द कसा काय वापरू शकता त्यावर देशपांडे यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करत,रस्त्यांवर परवानगी न घेता पांढऱ्या पट्ट्या मारणे आणि स्वतःची मर्जी चालवणे हा एक प्रकारे सांस्कृतिक दहशतवादच आहे, असे उत्तर दिले. तसेच,तुम्ही आमच्या धर्माच्या आड येऊ नका,असा इशाराही देशपांडे यांनी कुणाल जैन यांना दिला. 

या वादानंतर कुणाल जैन यांनी आपली अधिकृत प्रतिक्रिया देताना मनसे आणि संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे. जैन समाज हा नेहमीच अहिंसेच्या मार्गाने चालणारा आणि शांतताप्रिय समाज आहे. आमचा वाद कोणत्याही स्थानिक मुद्द्यावर असू शकतो, पण त्याला धार्मिक स्वरूप देऊन संपूर्ण जैन समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. संदीप देशपांडे वारंवार जैन धर्म,आमचे सण आणि साधू-संत यांच्याबद्दल अपशब्द वापरून समाजाचा अपमान करत आहेत. हे आता सहन केले जाणार नाही.

वाहन मॉडिफिकेशन केले असल्यास आधी 'हे' काम करा; अन्यथा Insurance Claim होऊ शकतो रिजेक्ट