प्रशांत जव्हेरी
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी गावात अजूनही रस्ता पोहोचलेला नाही. परिणामी आजारी रुग्णांना वेळेवर उपचार मिळवण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. असा प्रवास त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे. पण अशा आणीबाणीच्या स्थितीत जर काही बरं वाईट झालं तर त्यााला जबाबदार कोण असा प्रश्न इथले स्थानिक विचारत आहेत. शिवाय एकीकडे विकासाची गंगा आली आहे असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे ती आमच्या पर्यंत का पोहोचली नाही अशी तक्रारही या भागतल्या लोकांची आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रेंगीता आट्या चौधरी ही महिला जिल्ह्यातील केलापाणी या गावात राहाते. हे आदीवासी गाव आहे. या गावात अजूनही पक्का रस्ता नाही. मुलभूत सुविधांपासून हे गाव कोसो दुर आहे. या गावात कुठल्याही सुविधा नाहीत. गावात जर कुणी अजारी पडला तर ऐन वेळी कुठलीही साधनं दवाखान्यापर्यंत पोहचण्यासाठी नाहीत. अशी स्थिती या गावात नुकतीच उद्भवली. रेगीता चौधरी या महिलेची तब्बेत अचानक बिघडली. घरघुती उपचाराने काही झाले नाही. त्यांना रुग्णालयात घेवून जाण्या शिवाय पर्याय नव्हता.
पण घेवून कसे जायचे असा प्रश्न गावकऱ्यांपुढे होता. रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. पंधरा किलोमिटरचा लांब दवाखाना होता. वाटेत डोंगर आणि दऱ्या. पाय वाटेने जाण्या शिवाय पर्याय नव्हता. अशा वेळी झोळी करून रेगीता चौधरी यांना दवाखान्यात नेण्यासाठी गावकरी निघाले. चार तास चालून पंधरा किलोमिटरचं अंतर त्यांनी कापले. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार होवू शकले. जर वेळेत त्यांना दवाखान्यात दाखल केले नसते तर घात झाला असता. पण त्याला जबाबदार कोण असा प्रश्न या गावातले लोक विचारत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Eknath Shinde : महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे खूष नाहीत, अमित शाह यांची घेतली भेट
स्वातंत्र्यानंतर सात दशकांनीही केलापाणी ग्रामस्थांना मूलभूत सुविधा नसल्याची हृदयद्रावक वास्तव समोर येते आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र पुढे काही होत नाही. दर वेळी कोणीतरी झोळीतून मरणाच्या उंबरठ्यावरून फिरतो. हा प्रश्न केवळ केलापाणीचाच नाही, तर विकासापासून दूर असलेल्या अनेक आदिवासी गावांचा आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने रस्ता बांधणीसाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.