Nandurbar News: ...म्हणून जावयाने पेटवली सासरवाडी, 15 क्विंटल धान्य, लाखोंच्या साहित्याची राख, नेमकं काय घडलं?

केवळ सासुरवाडीच नाही, तर शेजाऱ्याचे घरही या आगीत जळून खाक झाले असून संतापलेल्या जावयाचे हे टोकाचे पाऊल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

Nandurbar News:  धडगाव तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. पत्नीला परत पाठवत नसल्याच्या रागातून एका जावयाने चक्क सासुरवाडीच पेटवून दिली आहे. केवळ सासुरवाडीच नाही, तर शेजाऱ्याचे घरही या आगीत जळून खाक झाले असून संतापलेल्या जावयाचे हे टोकाचे पाऊल सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

Manoj Jarange Patil: 'पाय एकीकडे, हात एकीकडे', कराड गँगच्या धमकीनंतर मनोज जरांगेंचं थेट आव्हान

जावयाने पेटवली सासरवाडी

समोर आलेल्या माहितीनुसार, धडगाव तालुक्यातील कुंडल मोहूपाडा येथे नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. खडक्याचा पाटील पाडा येथील मिथुन पाडवी याचे लग्न कुंडल येथील मुलीशी झाले होते, मात्र वादामुळे पत्नी माहेरी राहत होती. पत्नीला परत नेण्यासाठी आलेल्या मिथुनला सासऱ्यांनी नकार दिला, आणि याच रागातून जावई मिथुनने थेट सासुरवाडी गाठून घराला आग लावून दिली.

Advertisement

उन्हाळ्याचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग शेजारी राहणाऱ्या सुभाष वळवी यांच्या घरापर्यंतही पसरली. या भीषण आगीत दोन्ही कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात अन्नधान्य, कपडे आणि घराचे छप्पर जळून खाक झाले असून दोन्ही कुटुंबे आता उघड्यावर आली आहेत. या घटनेनंतर जावई फरार झाला असून त्याचा विरोधात सासूने दिलेल्या फिर्यादीवरून धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बुलढाण्यात जावयाला मारहाण 

दुसरीकडे, बुलढाण्यामध्ये सासू सासऱ्याने पोलीस जावयाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सासू-सासर्‍यांनी मुलीच्या आत्महत्या प्रकरणात जावयाला जाणीवपूर्वक अडकविले आणि भांडण करण्याच्या उद्देशाने जावयाच्या गावात जाऊन भर गल्लीत व पोलीस स्टेशनमध्ये बेल्टने व काठीने मारहाण  केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी सासू-सासरे व साळ्या विरुद्ध विविध कलमाने गुन्हे दाखल केले आहे.

Women Cricketer: सेक्सटॉर्शन महागात पडलं! महिला क्रिकेटरला मुंबई पोलिसांचा दणका, तिघांना अटक

Topics mentioned in this article