Nandurbar News: नगरपरिषदेचे खोटे शिक्के, बोगस सही.. कॅफेत सुरु होता गोरखधंदा; 5 अटकेत

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर याठिकाणी नंदुरबार नगरपरिषदेचे बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी असा मुद्देमाल आढळून आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

 प्रशांत जव्हेरी, नंदुरबार:

Nandurbar News:  नंदुरबारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नंदुरबारमध्ये बनावट जन्म मृत्यु दाखले बनविणारे रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

 बनावट जन्म मृत्यूचा दाखला बनवणारे रॅकेट उघडकीस

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार पोलीसांनी शहरातील एका सायबर कॅफेवर छापा टाकत या ठिकाणी सुरु असलेल्या बनावट जन्ममृत्यु दाखल्याचे रॅकेट उघडकीस आणले आहे. शहरातील शास्त्री मार्केटमधल्या आर. के सायबर कॅफे मध्ये हा सारा प्रकार सुरु होता. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर याठिकाणी नंदुरबार नगरपरिषदेचे बनावट शासकीय शिक्के, बनावट दाखले, लॅपटॉप, प्रिंटर इत्यादी असा मुद्देमाल आढळून आला.

Pune News: अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला आले अन् गर्दीत दागिने चोरून गेले, चोरलेल्या दागिन्यांची किंमत ऐकून

पाच आरोपी अटकेत..

याबाबत अधिकच्या तपासानंतर सायबर कॅफेच्या दोन मालकांसोबतच नंदुरबार नगरपरिषदेमधील जन्म मृत्यु विभागातील एक कंत्राटी कर्मचारी, एक शिपाई आणि एक खाजगी इसम अशा पाच जणांचा प्राथमिक सहभाग यात आढळून आला आहे. त्यामुळेच याप्रकरणी या पाचही आरोपींना अटक करुन त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहीत जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस यांनी दिली आहे.  

नक्की वाचा - Shocking news: बाप रे! एक मिरची 5,000 रुपयांना! हिरव्या मिरचीचा 'तिखट' कारनामा पाहून पोलीसही हादरले