प्रशांत जव्हेरी, नंदुरबार: रस्ता नसल्याने बांबुची झोळी करुन प्रसुतीसाठी आणत असलेल्या एका आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पिपंळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बारीपाड्याच्या वेहगी मधली ही घटना आहे. मुलभूत सुविधाच नसल्यामुळे नागरिकांना हाल सोसावे लागत असून या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अनिता सुरेश वसावे हा महिलेला प्रसुती त्रास होवू लागल्याने पालहा पाटीलपाड्यापासून मुख्य रस्त्या हा जवळपास सात किलोमीटर असल्याने तिला बांबुच्या झोळीत टाकून मुख्य रस्तापर्यत आणल्या जात होते. रस्त्यात वेहगी नदीला पुर असून त्याच्यावर देखील पुल नसल्यान या पाण्याच्या प्रवातून ही बांबुची झोळी करत तिला नातेवाईक डोंगरदऱया टुडवत मुख्य रस्ता गाठत होते.
मात्र अशातच तिला जास्त त्रास होवूनच तिची रस्तातच प्रसुती झाली आहे, तिला खाजगी वाहनाने मग पिपंळखुटा ग्रामीण रुग्णालयापर्यत नेण्यात आले असून महिला आणि बाळ यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजत आहे. वेहगी ते बारीपाडा रस्ता व्हावा यासाठी या ठिकाणीच्या ग्रामस्थांनी वारंवार मागणी केली आहे. यासाठी 31 सप्टें 2024 ला या ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन देखील केले होते. मात्र आश्वासनापलीकडे यांच्याहातात काहीच पडले नसल्याने आजही आरोग्याच्या मुलभुत सुविधांसाठी याठिकाणीच्या ग्रामस्थांना मरण यातना भोगाव्या लागत आहे
( नक्की वाचा : 'राजकीय पोळी भाजू नका, नाहीतर तोंड भाजेल'; जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ठणकावले )