नंदुरबार जिल्ह्यातील नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे पशु वैद्यकीय अधिकारी हर्षल पाटील यांना 300 रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार यांच्या गायीचा मृत्यू झाला होता. गाईचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते. तक्रारदार यांच्या गाईचे शवविच्छेदन करून देण्याच्या मोबदल्यात आरोग्य अधिकारी हर्षल पाटील यांनी तक्रारदारांकडून शासकीय फीचे 150 रुपये गुगल पेद्वारे घेतले.
यानंतर हर्षल पाटील यांनी तक्रारदाराकडून 400 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने तडजोड करीत शेवटी 300 रुपये ठरवले. तक्रारदाराने गुगल पे द्वारे 300 रुपये हर्षल पाटील यांना पाठवले. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे.