Narcotics Control Bureau Mumbai: केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. कारवाईमध्ये महाराष्ट्रातून कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय अंमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जवळपास 135 कोटी रुपयांचे 199.29 किलोचे अंमली पदार्थ, एक वाहन आणि दोन कारखाने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी पुढील तपास आणि कार्यवाही सुरू असल्याची माहिती नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयाने दिली आहे.
कुठे आणि कशा पद्धतीने करण्यात आली कारवाई?
केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुंबई पथकाने पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावाजवळ एका संशयित वाहनाला अडवले. यावेळेस वाहनातील साहित्याची बारकाईने तपासणी केल्यावर संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळली. याचा पाठपुरावा करताना पुण्यातील मिडगुलवाडी येथे एक गुप्त युनिट सापडले. तपासणी केली असता या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अंमली पदार्थांचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले. या गुप्त प्रयोगशाळेमध्ये उपकरणे, जनरेटर, ड्रायर इत्यादी साहित्य अत्याधुनिक गोष्टी आढळल्या.
पुढील एका कारवाईमध्ये आंबेगावातील नारायणगावाजवळ 25.95 किलो अंमली पदार्थ कच्च्या मालाच्या मोठ्या साठ्यासोबत आणखी एका गुप्त उत्पादन युनिट आढळले. दरम्यान या दोन्ही ठिकाणी अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे गुप्त युनिट एकाच समूहाद्वारे चालवल्या जात होत्या, अशी माहिती तपासाद्वारे समोर आली आहे.
अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला अटक
तसेच मंचर येथे बेकायदेशीररीत्या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे. पुण्यातून हा सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्त्वाच्या सूत्रधाराची माहिती पथकाला मिळाली, साथीदारासह त्याच्या देखील मुसक्या मिरारोड येथून आवळ्यात आल्या. या तपास प्रक्रियेत सबळ माहिती आणि पुरावे सापडले आहेत. हा अवैध उत्पादित अंमली पदार्थ महाराष्ट्र, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः अवैधरित्या ताडी तयार करण्यासाठी विकले जात होते.
या अंमली पदार्थाचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो, अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. दरम्यान निवडणूक आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या अशा अवैध उत्पादनाला आणि वाहतुकीला अटकाव करणाऱ्या कार्यवाहीत मोठे यश मिळाले आहे, असे माहिती व जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
VIDEO:Baramatiमध्ये सुप्रिया सुळेच जिंकणार,अजित पवारांवर पुन्हा साधला निशाणा
आणखी वाचा
शरद पवार मंदिरात गेले अन् नारळही फोडला, काय होतं निमित्त? वाचा सविस्तर
'कचा कचा' वक्तव्य भोवणार? अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
इंडिगो फ्लाइटच्या उपम्यामध्ये मॅगीपेक्षाही अधिक सोडिअम, प्रसिद्ध इन्फ्लुएंसरच्या Vlogमुळे नवा वाद