राज्यातील पालकमंत्र्यांची घोषणा करून काही तास उलटताच नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही स्थगिती देण्यात आल्याचं समजते. या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन वाद सुरू होता. रायगडसाठी भरत गोगावले आणि नाशिकसाठी दादा भुसे उत्सुक होते. मात्र नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन आणि रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांना पालकमंत्री घोषित केल्यानंतर भरत गोगावले नाराज होते. गोगावले समर्थकांनी मुंबई-नाशिक महामार्गावर टायर जाळून आपला असंतोष व्यक्त केला होता.
Live Update : गडचिरोलीत दोन नाही, 3 पालकमंत्री ठेवा: विजय वडेट्टीवार यांचा टोला
गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व मिळवण्यात अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झाले. मात्र सहपालकमंत्री हे नवीन पद निर्माण करत त्यांनी ही जबाबदारी शिवसेनेचे मंत्री असलेले आशिष जयस्वाल यांच्याकडे दिली आहे. त्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला टोला मारत दोन नाही तर तीन पालकमंत्री करा, असा सल्ला दिला आहे. तसे केल्यास एकमेकांवर लक्ष ठेवता येईल असा सल्ला त्यांनी दिला.
Live Updates: बदलापूर अत्याचार प्रकरण आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या घरावर बँकेने जप्तीची नोटीस लावली आहे. त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही जप्तीची नोटीस लावली आहे. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी जना स्मॉल फायनान्स बँक या खाजगी बँकेकडून अडीच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र अत्याचार प्रकरणानंतर त्यांच्या घराची तोडफोड झाल्याने बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी वास्तव्याला गेले.
त्यांना कोणताही कामधंदाही नसल्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. त्यामुळेच आता या बँकेने त्यांच्या घरावर थेट जप्तीची नोटीस लावली आहे. ४ डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस लावण्यात आली असून नोटीस लावल्यापासून ६० दिवसात थकीत २ लाख १६ हजार रुपये रकमेचा भरणा करा, अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल, असा या नोटीसमध्ये उल्लेख आहे. या नोटीसची मुदत ४ फेब्रुवारीपर्यंत असून तोपर्यंत या रकमेचा भरणा केला जातो का? हे आता पाहावं लागणार आहे.
DCM Eknath Shinde Speech: मी नाराज नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील माध्यम मी नाराज असल्याच्या बातम्या पसरवत आहेत. पण तसं काहीच नाही मी इथं कामात आहे. नाराज नाही. आज नवीन महाबळेश्वर हा खूप मोठा प्रकल्प आहे त्या संदर्भात मी बैठक घेतली. अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
रायगड व नाशिक या जागांच्या पालकमंत्री पद वाटपाला स्थगिती दिली आहे. त्यावरही लवकरच योग्य तो निर्णयहोईल. माझा एकच उद्देश आहे या भागाचा कायापालट करण, सर्वतोपरी विकास करणं, महाराष्ट्र मध्ये पर्यटनाला चालना देणारी जी जी ठिकाण आहेत ती सगळी आम्ही विकसित करणार आहोत.
स्थानिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून इथला इतिहास इथली संस्कृती जोपासण्याच आम्ही निश्चित काम करू असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदाची अपेक्षा ठेवली हे काही चुकीचे नाही अपेक्षा ठेवणं मागणी करणं हा एक प्रक्रियेचा भाग सर्व गोष्टींवर मार्ग निघेल असेही शिंदे यांनी सांगितले.
Nashik Crime: राहत्या घरात 8 वर्षीय मुलाचा मृतदेह, नाशिकमधील धक्कादायक घटना
- नाशिकमधील धक्कादायक घटना
- राहत्या इमारतीच्या डकमध्ये संशयास्पदरित्या आढळला 8 वर्षीय मुलाचा मृतदेह
- अल्पवयीन मुलगा मूकबधिर असल्यानं संशयिताने फ़ायदा घेतल्याचा पोलीसांना संशय
- नाशिकच्या गंधर्व नगरी परिसरातील घटनेनं खळबळ
- रविवारी सायंकाळी सापडला होता मृतदेह, शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्यावर अत्याचार झाल्याचं उघड
- उपनगर पोलीसांकडून गुन्हा दाखल करत तपास सुरू
- संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांचे तीन पथक रवाना
Palghar News: चोरीची वीज जोडताना वॉचमनचा मृत्यू
पालघरमध्ये चोरीची विज जोडणी करताना शॉक लागून एका रहिवाशी सोसायटीच्या वॉचमनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरच्या टेंभोडे येथील श्रीपदी सोसायटीतील ही घटना असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. वॉचमन कमल सौद याचा विजेच्या झटक्याने मृत्यू झालाय. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. तर, अवैध वीज जोडणी करत असताना घडला असून सोसायटीच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा मयत वॉचमनच्या कुटुंबीयांचा आरोप केला आहे.
Chakan MIDC Fire: चाकण एमआयडीसीत गोळीबार, व्यापाऱ्यावर हल्ला
चाकण औद्योगिक वसाहतीत गोळीबाराची घटना घडलीये. कैलास स्टीलचे मालक अजय सिंग यांच्यावर हा गोळीबार झाला असून एक गोळी पोटात तर एक गोळी पाठीत लागलेली आहे. दोन अज्ञात दुचाकीवर आले अन त्यांनी कंपनीच्या गेटवर हा हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोर पसार झालेत. अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडलीये. कंपनी मालक अजय सिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. या हल्ल्यामागचं कारण हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या नंतर समोर येईल. हल्लेखोरांचा शोध सुरु असून पोलिसांनी दहा ते बारा पाथके रवाना करण्यात आली आहे..
MVA Meeting: मविआची सिल्व्हर ओकवर दीड तास बैठक; पुढील रणनितीवर चर्चा
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान साधारणपणे दीड तास बैठक झाल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे निघाले आहेत. महाविकास आघाडीच्या पुढील रणनीती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे
पंचवीस तारखेला संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणामध्ये दोषींला कडक शिक्षा व्हावी यासाठी जो जन आक्रोश मोर्चा मुंबई काढला जाणार आहे त्या संदर्भात महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय असणार...? याबाबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे
महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव दिसत होता आणि त्या दृष्टिकोनातून पुढील पावलं नेमकी काय उचलायची यासाठी लवकरच महाविकास आघाडीचे राज्यस्तरीय महत्त्वाच्या नेत्यांची बैठक सुद्धा होऊ शकते
Pune News: वाल्मिक कराड प्रकरणात भाजप नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी
वाल्मीक कराड प्रकरणात भाजप नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कडून चौकशी
पुणे भाजप नेते दत्ता खाडे बीड येथे चौकशीसाठी सियाडी समोर
काल दत्ता खाडे यांना CID कडून फोन आला
दत्ता खाडे यांना फर्ग्युसन रोडवर ऑफिस जागा खरेदी संदर्भात चौकशीसाठी बोलावण्यात आली ची माहिती
आर्थिक व्यवहारा संदर्भात दत्ता खाडे सीआयडी कडून चौकशी
अटक होण्याची शक्यता
Solapur News: भंडारा जिल्ह्यातील पंचायत समितीवर महायुतीचा झेंडा
भंडारा जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडणुका आज पार पडल्या. अडीच वर्षाच्या कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी, भंडारा, लाखांदूर या ठिकाणी भाजप सह राष्ट्रवादी अजित पवार गटाचा वर्चस्व दिसून आला. तर लाखनी, पवनी या ठिकाणी महाविकास आघाडीला समाधान मानावे लागले.
लाखांदूर पंचायत समितीचे सभापती म्हणून पुरुषोत्तम ठाकरे, भाजपा तर उपसभापती संजना वरखडे राष्ट्रवादी काँग्रेस, लाखनी पंचायत समितीमध्ये सभापती अश्विनी कानेकर काँग्रेस, उपसभापती सुनील बांते, मोहाडी पंचायत समितीवर सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश शेंडे, तर भाजपचे देवा चकोले यांची उपसभापतीपदी निवड झाली. पवनी पंचायत समिती मध्ये काँग्रेसचे नारनवरे हे सभापती म्हणून तर उपसभापती भाजपचे प्रमोद मेंढे यांची निवड झाली. भंडारा पंचायत समितीमध्ये भाजपचे कल्पना कुर्जेकर यांची सभापती म्हणून तर उपसभापती म्हणून राष्ट्रवादी चे नागेश भगत यांची निवड झाली. तुमसर पंचायत समिती मध्ये सभापतीपदी राष्ट्रवादीच्या दीपा गौपाले तर उपसभापती भाजपच्या सुभाष बोरकर यांची निवड झाली. तर येत्या 27 जानेवारीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Kolkata Doctor Death Case: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण: आरोपी संजय रॉयला जन्मठेप
कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Pune Fire: पुणे शहरातल्या मंगळवार पेठेतील घरात भीषण आग
पुणे शहरातल्या मंगळवार पेठेत असलेल्या एका घरात भीषण आग
पुणे आरटीओ लगत असलेल्या काची वस्तीमध्ये आगीची घटना
पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण आणल
सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही
आगीच कारण अद्याप अस्पष्ट
घरातल्या वस्तूंचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान
Vijay Wadettiwar: अक्षयच्या एन्काऊंटरला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जबाबदार: विजय वडेट्टीवार जबाबदार
बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे!
त्याचप्रमाणे बंदुकीवर अक्षय शिंदेचे बोटाचे ठसे नसल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. बदलापूर प्रकरणी एकीकडे भाजप संस्थाचालकांवर कारवाई झालीच नाही तर दुसरीकडे आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर करून भाजपशी संबंधित संस्था चालकाला वाचवण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन सरकारने मांडलेल्या फेक नरेटिव्हची आज उच्च न्यायालयाने पोलखोल केली आहे. या एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे.
कारण ‘एकनाथचा एक न्याय‘ आणि ‘देवाभाऊचा न्याय‘ म्हणून स्वतःला हिरो बनवून घेण्यासाठी या एन्काऊंटर चे श्रेय घेण्याची स्पर्धा लागली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने फक्त मतांसाठी मांडलेला बाजार हळूहळू समोर येत आहे.
Live Update : मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळला
मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह आढळला
हॉटेलच्या २७ व्या मजल्यावर खोलीत महिलेचा मृतदेह आढळला
महिलेला स्क्रिझोफिनिया असल्याची माहिती
Live Update : अक्षयच्या एन्काऊंटरला पोलीस जबाबदार; बदलापूर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट
अक्षयच्या एन्काऊंटरला 5 पोलीस जबाबदार; बदलापूर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात मोठी अपडेट
न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल सादर
Live Update : विधानसभा निकालानंतर प्रथम उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट होणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे थोड्याच वेळात घेण्यात शरद पवारांची भेट
विधानसभा निकालानंतर प्रथम उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात भेट होणार
आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता
Live Update : महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच रायगड, नाशिक पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर
महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच रायगड, नाशिक पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्र्यांकडून यादी जाहीर - सूत्र
सध्या मुख्यमंत्री परदेशात असल्यामुळे ते आल्यानंतरच यावर तोडगा काढण्याचा विचार
एकनाथ शिंदे यांनी विनंती केली त्यानंतरच सीएम फडणवीस यांनी पालकमंत्री पदबाबत तात्पुरती स्थगिती दिल्याची माहिती - सूत्र
नाशिक पालकमंत्रीपद भाजपा तर रायगड पालकमंत्री पद एनसीपी ठेवण्यावर ठाम - सूत्र
Live Update : 19 जानेवारीला रद्द झालेला मनसेचा मेळावा आता 30 जानेवारीला वरळीत
19 जानेवारीला रद्द झालेला मनसेचा मेळावा, आता 30 जानेवारीला वरळी इथे होणार आहे.
Live Update : नशामुक्त पुण्यासाठी पुणे पोलीस सरसावले, शहरभर झाडाझडती!
पुणे पोलीस ड्रग्स विरोधात ॲक्शन मोडवर
नशामुक्त पुण्यासाठी पुणे पोलीस सरसावले
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेकडून शहरभर झाडाझडती
शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकांकडून सर्च ऑपरेशन सुरू
पोलिसांकडून शहरभर विशेष सर्च ऑपरेशन राबविण्यात येणार
Live Update : काल रात्री झालेल्या दगडफेकीनंतर नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता....
नंदुरबार शहरात रात्री झालेल्या दगडफेकीनंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण शहर भरात मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच रात्री संवेदनशील भागातून संशयित 15 ते 20 जणांना अटक देखील करण्यात आली आहे. मात्र सकाळपासूनच परिस्थिती नियंत्रणात असून नंदुरबार शहर पूर्ववत सुरू असून तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. शहरात शांतता असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व समाज माध्यमांवर कुठलीही अफवा पसरवू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Live Update : दख्खनचा राजा जोतिबाच चार दिवस दर्शन बंद राहणार
दख्खनचा राजा जोतिबाच चार दिवस दर्शन बंद राहणार आहे. मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी या काळात देवाची उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी कासव चौक येथे ठेवण्यात येईल. मूळ मूर्ती सुस्थितीत राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळविले होते. त्यानंतर पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्याची सूचना केली. त्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मूर्तीची पाहणी केली. जिल्हाधिकारी, गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारपासून मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्याचा निर्णय झाला.
Live Update : अवघ्या पाच दिवसांत 89 हजारांवर अर्ज, राज्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांकडून अर्जाचा पाऊस
पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची साठी आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली
आणि अवघ्या पाच दिवसांमध्ये तब्बल ८९ हजारांहून अधिक अर्ज आरटीई लॉटरीसाठी दाखल झाले.
येत्या २७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी असल्यामुळे पालकांना आपल्या मुलांचे अर्ज भरण्यासाठी आणखी नऊ दिवसांचा कालावधी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Live Update : पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटीसा
पुण्यातील 65 रिक्षा चालकांना आरटीओकडून नोटीसा
हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारीनंतर आतापर्यंत ६५ रिक्षा चालकांना नोटीसा
यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या आहेत
रिक्षा चालकांच्या वाढलेल्या तक्रारींमुळे पुणे आरटीओकडून हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
आरटीओने रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी ८२७५३३०१०१ हा व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू केला आहे
Live Update : दमदार पाऊस व थंडीच्या पोषक वातावरणामुळे जिल्ह्यातील ज्वारीचे पीक जोमात
धाराशिवमध्ये 25 हजार 351 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली असून आठही तालुक्यामध्ये दमदार पाऊस व थंडीच्या पोषक वातावरणामुळे ज्वारीचे पीक जोमात आले आहे. पांढरी शुभ्र ज्वारी हे धाराशिवच्या ज्वारीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. पांढरी शुभ्र ज्युट, मालदांडी, दगडी अशा पाणीदार व चवदार ज्वारीला मुबंई, पुणे, कोल्हापूर येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यंदा झालेला समाधानकारक पाऊस व सुरू असणारी थंडी हे ज्वारी पिकाला पोषक आहे.
Live Update : राज्यात 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. Live राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन विभागाकडून भीती व्यक्त केली जात आहे.
Live Update : सभापती, उपसभापतिपदी कुणाची वर्णी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा...
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील भंडारा, पवनी, तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या सातही पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. त्यामुळे सभापती, उपसभापतिपदी कुणाची वर्णी लागते, याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.