जाहिरात

Nashik News: महिला आयोगाकडे आलेल्यांना खरातकडे पाठवलं? रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, थेट अटकेची मागणी

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खळबळजनक दावा केला असून महिला आयोगाकडे येणाऱ्या महिलांना खराताकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप केला आहे. 

Nashik News: महिला आयोगाकडे आलेल्यांना खरातकडे पाठवलं? रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप, थेट अटकेची मागणी

राहुल वाघ, नाशिक:

Ashok  Kharat Case:  नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या राज्यभरात खळबळ उडाली आहे. अशोक खरातने भविष्य बघण्याच्या नावाखाली शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचे समोर येत आहे. याप्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव येत समोर येत आहे. याबाबतच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खळबळजनक दावा केला असून महिला आयोगाकडे येणाऱ्या महिलांना खराताकडे पाठवले जायचे, असा गंभीर आरोप केला आहे. 

Maharashtra Politics: CM फडणवीसांबाबत 'ते' विधान, सुप्रिया सुळेंवर काँग्रेसचा संताप; 'मविआ'त नवा वाद

'रुपाली चाकणकरांना अटक करा...'

अशोक खरात प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच संदर्भात त्यांनी आज  नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर याच हे सर्व रॅकेट चालवत होत्या, रूपाली चाकणकर यांना अटक करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

"हे रॅकेट रूपाली चाकणकर चालवत होत्या असे समोर येत आहे.  झाशीची राणी प्रतिष्ठानच्यावतीने मी रुपाली चाकणकर यांना अटक करण्याची मागणी केली आहे.  शिर्डी, आर्वीमध्ये जो इतरांवर जो गुन्हा दाखल झाला होता तो गुन्हा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांच्या दबावानेच दाखल झाला होता," असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

LPG Charge News: खाण्याच्या बिलमध्ये रेस्टॉरंट LPG चार्ज किंवा गॅस सरचार्ज जोडतंय? या क्रमांकावर करा तक्रार

रुपाली ठोंबरेंचे गंभीर आरोप 

तसेच "राज्य महिला आयोगाकडे आलेल्या महिलांचे समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतील ग्रह चेक करुन घ्या, असे बाबा आहेत. असं करुन ते प्रकरण वर्ग केल जात होत, असा दावाही रुपाली ठोंबरेंनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण एसआयटीकडे गेलं असलं तरी आम्ही रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे, त्यांनाही आरोपी करणे गरजेचे आहे," अशी मागणी केल्याचंही त्यांनी सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com