LPG Charge and Gas Surcharge Complaint: मिडल ईस्टमध्ये (मध्य पूर्व) सुरू असलेल्या तणावाचा परिणाम भारत देशावरही दिसून येत आहे. काही ठिकाणी गॅसच्या तुटवड्यामुळे रेस्टॉरंट आणि ढाबे बंद झाले आहेत, तर काही ग्राहकांनी सिलिंडर बुकिंगमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी (26 मार्च) हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी महत्त्वाची ॲडव्हायझरी (सल्लागार सूचना) जारी केली आहे. CCPAने (केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण) स्पष्ट केले आहे की, कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट बिलामध्ये 'LPG चार्ज', 'गॅस सरचार्ज', 'इंधन खर्च वसुली' (Fuel cost recovery), 'गॅस क्रायसिस चार्ज' किंवा यासारखा कोणताही शुल्क (Default) जोडू शकत नाही. हॉटेल आणि रेस्टॉरंटना हे सुनिश्चित करावे लागेल की, मेन्यू कार्डमध्ये दर्शवलेली किंमत हीच अंतिम किंमत असेल, ज्यामध्ये फक्त लागू असलेले अधिकृत टॅक्स समाविष्ट असतील. जर नियमांचे उल्लंघन करून हॉटेलने बिलात अतिरिक्त चार्जेस लावले, तर ग्राहक कुठे तक्रार करू शकतात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया सविस्तर...
(नक्की वाचा: Mahabaleshwar News: महाबळेश्वर 24 तास अंधारात, स्थानिकांसह पर्यटकांचे हाल! शहराचं भीषण वास्तव समोर, नेमकं काय घडलं?)
1. मॅनेजरला चार्जेस हटवण्याची विनंती करा
जर हॉटेल किंवा रेस्टॉरंटने बिलात LPG चार्ज किंवा गॅस सरचार्ज जोडला असेल, तर सर्वप्रथम तिथल्या मॅनेजरला तो अतिरिक्त चार्ज हटवण्यास सांगा. त्यांना जाणीव करून द्या की, CCPA च्या निर्देशानुसार अशा प्रकारचे ऑटोमॅटिक फ्युएल किंवा सर्व्हिस चार्ज आकारण्यास मनाई आहे.
(नक्की वाचा: Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून बदलणार इनकम टॅक्सचे गणित, Old Or New Tax Regime; तुमच्यासाठी काय ठरेल फायदेशीर?)
2. नॅशनल कंज्युमर हेल्पलाइनवर (NCH) तक्रार करा
जर मॅनेजरने चार्जेस हटवण्यास नकार दिला, तर तुम्ही नॅशनल कंज्युमर हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकता.
- कॉल करा: 1915 या क्रमांकावर कॉल करा.
- ॲप: NCH मोबाइल ॲप किंवा UMANG ॲपद्वारे तक्रार नोंदवा.
- WhatsApp: +91 8800001915 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमची तक्रार नोंदवू शकता.
तुम्ही 'ई-जागृति' पोर्टलच्या माध्यमातून संबंधित ग्राहक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या क्षेत्रातील जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा थेट CCPA कडे लेखी तक्रार देखील पाठवू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world