Malegaon Crime: वडिलांशी भांडण... चिमुकल्या लेकीला ओरबाडलं, अत्याचारानंतर दगडाने ठेचलं

Malegaon Dongrale Crime: या अल्पवयीन मुलीवर लहान लैंगिक अत्याचार करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

निलेश वाघ, नाशिक:

Malegaon Minor Girl Death Case: नाशिकच्या मालेगावमधून एक हादरवारी घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. गावातल्याच एका नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे समोर आले असून नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्य्या माहितीनुसार,  मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.

Nagpur Crime: 'तिने' कानाखाली मारली, 'त्याने' थेट जीव घेतला, नागपुरात भयंकर घडलं, पोस्टमार्टमने बिंग फुटलं

आजही डोंगराळे ग्रामस्थांनी या घटनेवरुन आक्रमक भूमिका घेत मालेगावपासून महामार्ग रोखला आहे. या अल्पवयीन मुलीवर लहान लैंगिक अत्याचार करण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संपूर्ण प्रकरणावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त करत खळबळजनक खुलासा केला आहे.

चित्रा वाघ संतापल्या..

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील तीन वर्षाच्या मुलीसोबत अमानुष प्रकार झाला. सकाळपासून खेळणारी मुलगी सापडेना म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केली. शोध घेत असताना मुलगी गंभीर अवस्थेत सापडली, तिला रुग्णालयात नेले असता मृत्यू झाल्याचे समोर आले. प्राथमिक तपासात आरोपी विजय खैरनारचे मुलीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते.

Advertisement

 महिनाभरापूर्वी झालेल्या या भांडणाचा राग मनात धरुन या नराधमाने अल्पवयीन मुलीसोबत सैतानी  कृत्य केले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. अशा राक्षसी वृत्तीला  महाराष्टात थारा नाही, हरामखोराला कठोर शिक्षा होईल. नराधमाला फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असं असं चित्रा वाघ यांनी सांगितले आहे. 

Shocking news: BJP नेत्याच्या पत्नीचा गुढ मृत्यू, सासरच्यांचा गुपचूप अंत्यसंस्काराचा डाव, पण पुढे...