राहुल वाघ, नाशिक:
Nashik Crime: अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे भोंदूगिरी, जादूटोणा आणि तोतया पोलिसांचा वापर करून एका महिलेला तब्बल ५ लाख ६० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना एखाद्या क्राईम थ्रिलरला साजेशी असून पोलिसही या प्रकरणामुळे चक्रावून गेले आहेत.
Earthquake VIDEO: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के! 5 जिल्हे हादरले; नागरिकांची धावपळ, सर्वत्र पळापळ
नेमकं काय घडलं?
डोंबिवली येथील ४८ वर्षीय व्यावसायिक महिला ४० लाखांच्या कर्जामुळे आर्थिक संकटात सापडलेली असताना याच परिस्थितीचा फायदा घेत, मुंबईतील बाबूराव जाधव याने तिला नाशिकमधील भोंदूबाबा विठोबा जाट याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला “दैवी शक्तीने पैशांचा पाऊस पाडतो” या आमिषाला बळी पडून ही महिला थेट नाशिकला पोहोचली.
सातपूर परिसरातील अमृत गार्डन येथे सुरुवातीला पूजा करून महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर मुख्य विधीसाठी तिला सापुताऱ्याच्या डोंगरदऱ्यात नेण्यात आले, तेथे भोंदूबाबाने दोन कोटी रुपये आल्याचा दावा करत नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगा दुरून दाखवल्या. मात्र हे अंतरराष्ट्रीय रॅकेट असून या सर्वांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंनिस ने केली आहे.
महिला त्या पैशांकडे पुढे सरकताच अचानक चार तोतया पोलिसांची एन्ट्री करत सांगितले की तपास करायचा आहे म्हणत त्यांनी महिलेला धमकावले घाबरलेल्या महिलेची हीच संधी साधत भोंदूबाबा, दलाल आणि बनावट पोलिसांनी मिळून मॅटर सेटल करण्याचे नाटक रचले आणि अखेरीस महिलेचे ५ लाख ६० हजार रुपये लंपास करून टोळी फरार झाली परतीच्या प्रवासात पुन्हा तेच कथित पोलिस दिसल्यावर महिलेच्या लक्षात आले की, आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरलो आहोत.
Pune News: पुणेकरांचा मोठा खोळंबा! शहरातील अत्यंत महत्त्वाचा पूल 1 महिना बंद; प्रवासाआधी 'हे' वाचा
यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी विठोबा जाट, बाबूराव जाधव आणि चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याप्रकरणी विठोबा जात याला न्यायालयात हजर केले असून त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भोंदूगिरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे अशा आमिषांना बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.