जाहिरात

Earthquake VIDEO: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के! 5 जिल्हे हादरले; नागरिकांची धावपळ, सर्वत्र पळापळ

सकाळी 8 वाजून 44 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले असून परभणीसह हिगोली जिल्ह्यालाही हा भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

Earthquake VIDEO: महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के! 5 जिल्हे हादरले; नागरिकांची धावपळ, सर्वत्र पळापळ

Maharshtra Earthquake News:  विदर्भ आणि मराठवाड्यातून अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी परभणी शहरासह विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी 8 वाजून 44 मिनिटाला भूकंपाचे धक्के जाणवले असून परभणीसह हिगोली जिल्ह्यालाही हा भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्कादायक प्रकाराने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के.. 

राज्यातील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांना आज सकाळी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरवून सोडले. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या प्राथमिक अहवालानुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली असून, याचे केंद्र हिंगोलीपासून २१ किमी आग्नेयेला जमिनीखाली १० किमी खोलीवर होते.

Pune News: पुणेकरांचा मोठा खोळंबा! शहरातील अत्यंत महत्त्वाचा पूल 1 महिना बंद; प्रवासाआधी 'हे' वाचा

​हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि परिसरात धक्क्यांची तीव्रता अधिक असल्याने अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत, तर काही ठिकाणी घरांवरील पत्रे हलल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्रामीण भागात अनेक घरांमध्ये मांडणीवरील भांडी खाली पडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

त्यासोबतच अकोला शहर आणि अकोला तालुक्यात सुमारे 5 ते 7 सेकंद जमिनीमध्ये कंपन जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाच्या वेळी गूढ आवाजासह जमिनीला हलकासा हादरा बसल्याचे नागरिकांनी सांगितले. या अचानक झालेल्या धक्क्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तातडीने सतर्कतेचा इशारा दिला असून, जुन्या व कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंगोली परिसरात वारंवार होणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे भूगर्भशास्त्रज्ञांकडून या क्षेत्राचा सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Local Megablock: मुंबईकरांनी लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द? वाचा..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com