Nashik Crime: ऑफिसमधून टॅब चोरल्याची तक्रार, फिर्यादीच झाला आरोपी, 121 नको ते व्हिडिओ सापडले

खरात फाईल्स प्रमाणेच ऑफिस बॉयविरोधात तक्रार दिल्यानंतर फिर्यादीच आरोपी झाल्याचं समोर आले असून तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप असल्याचे आढळून आले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Crime News:  नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. ऑफिस बॉय विरोधात तक्रार दिल्यानंतर कॅप्टन खरात स्वतःच या प्रकरणात आरोपी ठरला अन् भोंदुबाबाचा पर्दाफाश झाला. गेले दोन आठवडे खरात प्रकरण गाजत असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एक अश्लील कांड प्रकरण समोर आले आहे. खरात फाईल्स प्रमाणेच ऑफिस बॉयविरोधात तक्रार दिल्यानंतर फिर्यादीच आरोपी झाल्याचं समोर आले असून तब्बल 121 अश्लील व्हिडिओ क्लिप असल्याचे आढळून आले आहे. 

Ganesh Naik: " काही जण लपण्यासाठी जातात, काही वाचण्यासाठी जातात", गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरामध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाने आपल्या ऑफिस बॉयविरोधात खंडणीची तक्रार दिली होती. ऑफिसमधील टॅब चोरुन त्याद्वारे ब्लॅकमेल केले जात आहे, तसेच तब्बल 12 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप या व्यावसायिकाने केला होता.  रवींद्र गणपत एरंडे याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दहा हजारांची खंडणी स्विकारताना ऑफिस बॉय आकाश बकरेसह तिघांना अटक केली होती.

Advertisement

मात्र आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून फिर्यादीच आरोपी ठरला आहे. स्वतः रवींद्र एरंडे याने परवा मोबाईल टॅब चोरी गेल्याचे सांगत मला अज्ञात  इसमांकडून ब्लॅकमेल होत असल्याचं सांगतसातपूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांच्या तपासात मोबाईल टॅबमध्ये एकूण 121 अश्लील व्हिडिओ क्लिप असल्याचे आढळून आले आहे. 

दरम्यान, याप्रकरणी आकाश वखरे ,प्रकाश पानपाटील ,सुरज गवई, श्रीपत शिंदे या चौघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून पिडितांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी आणखी काय- काय खुलासे होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Nashik News: दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

Topics mentioned in this article