जाहिरात

Ganesh Naik: " काही जण लपण्यासाठी जातात, काही वाचण्यासाठी जातात", गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

"काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात" असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

Ganesh Naik: " काही जण लपण्यासाठी जातात, काही वाचण्यासाठी जातात", गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना डिवचलं

मनोज सातवी, पालघर

Ganesh Naik Vs DCM Eknath Shinde:  भारतीय जनता पक्षाचे नेते, वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा संघर्ष चांगलाच वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मंत्री गणेश नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदेंना वारंवार टार्गेट केलं जात आहे. महापालिका निवडणुकावेळी गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचत थेट आव्हान दिले होते. आता पुन्हा एकदा गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 

Nashik News: दिंडोरीत कार विहिरीत कोसळून भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

काय म्हणाले मंत्री गणेश नाईक? 

"ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही" असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे "काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात" असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

पालघर येथे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख व सध्याचे उबाठा उपनेते उदय बंधू पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना उबाठाचे राजन विचारे,  नेते विनायक राऊत , माजी मंत्री मनीषा निमकर, उबाठाच्या उपनेत्या, ज्योती ठाकरेतसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे या वक्तव्यामुळे आता मंत्री गणेश नाईक आणि शिंदे गटात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Anjangaon Controversy: अंजनगावातील पुतळ्याचा वाद मिटला! लक्ष्मण हाकेंचे आंदोलन यशस्वी; काय झाला निर्णय?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com