जाहिरात

Ashok Kharat: मर्सिडीज, 21 देशांची भ्रमंती, फार्म हाऊसचा खर्च.. अशोक खरातने पुण्यातील व्यावसायिकाला कसं लुटलं?

 लॉजिस्टिकच्या व्यवसायात चांगली सुरूवात होण्याकरिता तसेच मृत्यूची भिती दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Ashok Kharat: मर्सिडीज, 21 देशांची भ्रमंती, फार्म हाऊसचा खर्च.. अशोक खरातने पुण्यातील व्यावसायिकाला कसं लुटलं?

Nashik Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या नवनव्या कारनाम्यांचे दररोज खुलासे होत आहेत. अशोक खरातने भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक, महिलांवर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आता खरातचा आणखी एक प्रताप समोर आला असून  लॉजिस्टिकच्या व्यवसायात चांगली सुरूवात होण्याकरिता तसेच मृत्यूची भिती दाखवून पुण्यातील व्यावसायिकाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक खरातवर आणखी एक गुन्हा

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये खंडणी आणि नरबळी, जादूटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याआधी जासूद यांनी अशोक खरातवर पाच कोटींची खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यासोबतच लॉजिस्टिकच्या व्यवसायात चांगली सुरूवात होण्याकरीता बाबाने अवतारपुजा करावयास सांगत विविध मार्गाने आर्थिक लूट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

Ashok Kharat: अशोक खरात HIV पॉझिटिव्ह? त्या व्हायरल व्हिडीओनं खळबळ, "हजार बायका पोरं संकटात.."

21 देशांचा प्रवास, मर्सिडीज घेतली

सुरुवातीला लॉजिस्टिकच्या व्यवसायात चांगली सुरूवात होण्याकरीता बाबाने अवतारपुजा करावयास सांगितली. ती पुजा करण्यापूर्वी मरणाची भिती दाखवुन तक्रारदाराकडून चक्क मर्सिडीज कार खरेदी केली. त्यानंतर खोटा साप दाखवत  परिसाची शक्ती प्राप्त करणेकरीता 21 देशांमध्ये भ्रमण करावे लागेल व तसे न केल्यास नागदेवता तुला दंश करेल व तुझा मृत्यू होईल अशी भिती घालून विविध देशांमध्ये घेऊन जात त्या प्रवासाचा खर्च करून घेतला. 

धक्कादायक म्हणजे या बाबाने  मिरगावच्या फार्महाउसचा बांधकामाचा खर्च वसूल केला. ईशान्येश्वर महादेव मंदिराच्या मागे तक्रारदाराच्या भोवती रिंगण आखून मृत्यूची भिती दाखवत अन्यायाने कैद केले आणि फार्म हाऊसचे फर्निचर खरेदीसाठी पैसे घेतले, असाही आरोप अशोक खरात याच्यावर करण्यात आला आहे. पोलीस आता या प्रकरणाचाही संपूर्ण तपास करत आहेत. 

Ashok Kharat: गणितात मठ्ठ, भाषांचीही बोंब, भोंदूबाबाचा दहावीची रिझल्ट आला समोर, नावंही बदललं!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com