Nashik Child Kidnapping: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, नाशिकमध्ये अल्पवयीन मुले, मुलींच्या अपहरणाच्या घटना वारंवार घडत आहेत. शाळकरी मुला- मुलींना फूस लावून पळवल्याच्या घटनांनी पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एका मुलासह दोन लहान मुलींना पळवल्याची घटना घडली होती. अशातच आता आणखी तीन मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे.
नाशिकमध्ये पुन्हा 3 मुलींचे अपहरण!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागांतून तीन मुलींना आमिष दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरणाचा पहिला प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. बहीण पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर मधील घरी होती. त्यावेळी अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले.
Israel attacks Iran: बॉलिवूडची अभिनेत्री दुबईत अडकली! PM मोदींकडे विनंती; भयानक परिस्थिती सांगितली
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला अपहरणाचा दूसरा प्रकार अंबड परिसरात घडला. फिर्यादी यांची मुलगी पांडव लेण्याजवळ होती. त्यावेळी अज्ञात इसमाने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिथे अपहरण केले. या प्रकरणाची तक्रार कोर्टास रवाना करून वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, अपहरणाचा तिसरा प्रकार श्रमिकनगर येथे दु घडला. बहीण कामावर गेले असता त्यांची बहीण घरी एकटीच होती. या मुलीला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे तिचे अपहरण केले. या अपहरण सत्रांनी नाशिक शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडून होत आहे.