Nashik Election: एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये मनसेचे इंजिन बंद! फक्त 1 जागा.. पराभवाचे कारण काय?

Nashik Election Result: राज ठाकरे यांनीही अनेक सभा आणि मुलाखतींमध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा केला होता. मात्र २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा हा गड कोसळला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Municiple Corporation Election 2026:  एकेकाळी नाशिक महापालिकेवर सत्ता गाजवणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज नाशिकमध्ये जवळपास संपल्याचं चित्र आहे. ३९ नगरसेवक निवडून देणाऱ्या नाशिककरांनी आता मनसेला केवळ एकाच जागेवर समाधान मानायला लावलंय.  नाशिकमध्ये राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काय चुकलं? वाचा...

नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचे काय चुकले?

एक काळ असा होता, जेव्हा नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती. ३९ नगरसेवकांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने मनसेचा महापौर नाशिक महापालिकेत विराजमान झाला होता. राज ठाकरे यांनीही अनेक सभा आणि मुलाखतींमध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा केला होता. मात्र २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचा हा गड कोसळला.

Jalgaon Election 2026: जेलमधून विजय, नवख्यांचा उदय, दिग्गजांना धक्का.. जळगाव निवडणुकीची 10 वैशिष्ट्ये

थेट सत्तेतून केवळ पाच जागांपर्यंत मनसे घसरली आता नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत, महाविकास आघाडी सोबत लढूनही मनसेला केवळ खात उघडत एकाच जागेवर यश मिळालं आहे. पक्षाला लागलेली गळती, ठोस नेतृत्वाचा अभाव आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांपेक्षा बाहेरून आलेल्यांना दिलेली संधी यामुळे नाशिकमध्ये मनसेला मोठा फटका बसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

संघटनात्मक बदल होणार का? 

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सोडून दिनकर अण्णा पाटील यांनी मनसेत प्रवेश करत निवडणूक लढवली. मात्र त्यांनाही अपयश आलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा झाला दुसऱ्याच दिवशी गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडींमुळे मनसेची विश्वासार्हता आणखी ढासळली.

Advertisement

Election Result: भाजपचा सर्वाधिक स्ट्राइक रेट; सर्वात कमी कोणाचा? 2017 च्या तुलनेत 'या' पक्षाला सर्वाधिक फटका?

दरम्यान, इतक्या मोठ्या पराभवानंतर आता राज ठाकरे नेमका कोणता निर्णय घेतात? नाशिकमध्ये संघटनात्मक फेरबदल होणार का? की मनसेला नव्याने उभारी देण्याचा काही ठोस आराखडा तयार होणार? हे पाहणं आता नाशिकच्या राजकारणात महत्त्वाचं ठरणार आहे.