जाहिरात

Election Result: भाजपचा सर्वाधिक स्ट्राइक रेट; सर्वात कमी कोणाचा? 2017 च्या तुलनेत 'या' पक्षाला सर्वाधिक फटका?

राज्यातील २९ महानगरपालिका निकालांचं चित्र स्पष्ट झालं असून सर्वाधिक जागा जिंकून भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

Election Result: भाजपचा सर्वाधिक स्ट्राइक रेट; सर्वात कमी कोणाचा? 2017 च्या तुलनेत 'या' पक्षाला सर्वाधिक फटका?

Municipal Corporation Election Strike Rate : राज्यातील २९ महानगरपालिका निकालांचं चित्र स्पष्ट झालं असून सर्वाधिक जागा जिंकून भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजपला ८९ जागा, ठाकरे गट ६५, शिंदे गट २९, काँग्रेस २४, मनसे ६, अजित पवार ३ जागा मिळाल्या आहेत. राज्यातील २९ पैकी २३ महानगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार जिंकून आले आहेत. परिणामी भाजपचा स्ट्राइक रेट हा सर्वाधिक ६४.५१ टक्के इतका आहे. भाजपने २९ महानगरपालिकांमध्ये २,२०९ जागा लढविल्या होत्या, त्यातील १४२५ जागांवर जिंकल्या आहेत. 

शिंदे गटाचे १४९३ जागा लढवल्या होत्या, त्यातील ३९९ जागा (२६.७२) जिंकल्या आहेत, त्यानंतर अजित पवार गटाने १३५५ जागा लढवल्या त्यात १६७ (१२.३२) जागांवर यश मिळवलं आहे. 

PMC Result 2026:पुणेकरांचा धक्का! फायरब्रँड नेत्यांचा बँड वाजला; तात्या, भाऊ, ताई पडले...  5 हादरवणारे निकाल

नक्की वाचा - PMC Result 2026:पुणेकरांचा धक्का! फायरब्रँड नेत्यांचा बँड वाजला; तात्या, भाऊ, ताई पडले... 5 हादरवणारे निकाल

शिंदे गटापेक्षा एमआयएमचा स्ट्राइक रेट चांगला...

ठाकरे गटाने १२७५ उमेदवार लढवले आहेत, त्यातील १५४ उमेदवार (१२.०८) जिंकले. काँग्रेसने १३५९ जागांपैकी ३२४ जागा जिंकल्या असून त्यांचा स्ट्राइक रेट २३.८४ इतका आहे. तर मनसेचा स्ट्राइक रेट ३.९४ (३३० उमेदवार लढवून १३ जिंकले) इतका आहे. दुसरीकडे एमआयएमचे ४२३ उमेदवार लढले त्यातील १२६ जिंकले, त्यामुळे त्यांचा स्ट्राइक रेट २९.८ टक्के आहे. आपने ४५५ जागा लढविल्या त्यातील एक जागा जिंकली आहे.  मुंबईत काँग्रेसचे वंचित बहुजन आघाडीशी युती केली होती. त्यामध्ये काँग्रेसने १५१ जागा लढवल्या होत्या आणि २४ जिंकल्या. लढलेल्यांपैकी १५.८९ टक्के जागांवर काँग्रेस विजयी झाली.

२०१७ च्या तुलनेत २०२५ मधील यश


पक्ष                    २०१७             २०२५-२६

भाजप                 ११२५              १४२५

एकत्रित शिवसेना  ५०१              शिंदे गट - ३९९
                                             ठाकरे गट - १५४

काँग्रेस                ४८६             ३२४
एकत्रित राष्ट्रवादी  ३०९             अजित पवार गट - १६७
                                             शरद पवार गट - ३६

 मनसे                  २७               १३

अन्य                    २९८              ३२२

अपक्ष                   ९३                १९        


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com