निलेश वाघ, बारामती:
Nashik Malegaon-Manmad Road Accident: नाशिकमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये मालेगाव- मनमाड रोडवर ट्रॅव्हल्स आणि पिकअप वाहनाचा मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 20 हून अधिक प्रवासी जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मालेगावमध्ये भीषण अपघात
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मालेगाव तालुक्यातील वऱ्हाणे गावाजवळ पुण्याहून येणारी एक खासगी ट्रॅव्हल्स आणि समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅनची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, पिकअप वाहन थेट बसमध्ये घुसली. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. तर अन्य २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
Baramati Crime: शेतकऱ्यांनो सावधान! पुरंदर विमानतळाच्या नावाखाली मोठी फसवणूक; टोळीचा पर्दाफाश
पहाटे ३ वाजेच्या सुमारास जेव्हा प्रवासी गाढ झोपेत होते, तेव्हा हा अपघात झाला. वऱ्हाणे फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही भीषण धडक बसली. अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पिकअपचा चक्काचूर झाल्याने त्यातील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना आणि ग्रामस्थांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
सर्व जखमींना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मालेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.
रत्नागिरीमध्ये हिट अँड रन..
रत्नागिरी शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या ‘हिट अँड रन' अपघातात प्रसिद्ध ‘सहेली ब्युटी पार्लर'च्या संचालिका सुनीता राजेश साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास लाला कॉम्प्लेक्स येथील रस्त्यावर हा अपघात झाला. सौ. सुनीता साळवी या रस्त्यावर पडल्या असताना, राजीवडा येथील एका तरुणाने आपली भरधाव होंडा सिटी कार त्यांच्या अंगावरून नेली.
Pune News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह? येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली
या अपघातानंतर संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित तरुणावर हिट अँड रन'चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून राज्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांनी तातडीने दखल घेतली आहे. पालकमंत्री सामंत यांनी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.