जाहिरात

Pune News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह? येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली

हे तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघातानंतर एकच पळापळ झाली.

Pune News: पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह? येरवड्यात भरधाव कारचा थरार, भरधाव कार दुकानात घुसली
  • पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढत असून येरवड्यातील सादल बाबा दर्गा परिसरात कार अनियंत्रित झाली होती
  • मद्यधुंद चालकाच्या भरधाव कारने एका दुकानात घुसल्याने मोठे नुकसान झाले पण जीवितहानी टळली
  • पुणेकर या प्रकारांवर चिंता व्यक्त करत असून अशा घटनांमुळे शहरातील लोकांमध्ये भीती वाढली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

रेवती हिंगवे 

पुण्यात अनेक अशा घटना घडत आहेत ज्यामुळे शहराची एक वेगळीच ओळख बनत चालली आहे. मग त्यात टोळी युद्ध असो की घरघुती हिंसा असो या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्यातच कोयता गँगची ही दहशत पुण्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व सामान्य पुणेकर भीतीच्या सावटाखाली आहेत.पुण्यात काही ड्रिंग अँड ड्राईव्हच्या ही घटना घडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरून चालायचे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. त्यात आता आणखी एक ड्रिंग अँड ड्राईव्ह साखी घटना समोर आली आहे.  

पुणे शहरात 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या घटना थांबायचं नाव घेत नाही. काल म्हणजेच शनिवारी मध्यरात्री येरवड्यातील सादल बाबा दर्गा परिसरात एका भरधाव कारने धुमाकूळ घातला होता. मद्यधुंद अवस्थेत चालक गाडी चावलवत होता. त्याला कसलेच भान राहीले नव्हते असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. अशा स्थितीत गाडी चालवत असताना गाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार अनियंत्रित झाली. त्यानंतर ती थेट रस्त्याकडेला असलेल्या एका दुकानात जाऊन घुसली. 

नक्की वाचा - Beed News: देव दर्शनासाठी घेऊन गेले, बीडच्या महिलांना पुण्यात बोगस मतदान करायला लावले, पुढे जे घडले...

हे तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अपघातानंतर एकच पळापळ झाली.  या भीषण अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात कारचा प्रचंड वेग स्पष्टपणे दिसत आहे. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने दुकानात किंवा रस्त्यावर कोणीही नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.  मात्र, दुकानाचे आणि कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा  ड्रिंग अँड ड्राईव्हचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा घटना सारख्या कशा होतात असा प्रश्नही आता आम पुणेकर विचारत आहेत. 

नक्की वाचा - Pune News:नियतीचा न्याय! लेकाने बापाच्या पराभवाचा बदला तब्बल 47 वर्षांनी घेतला, हिशोब पूर्ण

पुणे पोलीस ही अशा घटना होवू नये साठी प्रयत्न करत असतात. पण असं असलं तरी त्याचा काही फायदा होताना दिसत नाही. उलट या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्याचा प्रत्यय शनिवारीही आला. हा अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पुणेकरांच्या ही याबाबत संतापजनक प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असलेल्या ड्रायव्हरवर कडक कारवाईची मागणी होत आहे. 

नक्की वाचा - Pune News: '1 मत मला 3 मतं भाजपला द्या' NCP च्या महिला उमेदवाराचा 'तो' Video Viral, पक्षांतर्गत वाद पेटला

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com