Nashik News : सध्या पावसामुळे निसर्ग बहरू लागला आहे. त्यामुळे अशा पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हिल स्टेशनबरोबरच गड-किल्ल्यावर जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला उजाळा देत आणि निसर्गाचा आनंद लुटत ट्रेकर्सना तासन् तास गडाच्या कुशीत रमायला आवडतं. अशाच प्रकारे ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
त्र्यंबकेश्वर येथील हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. पंकज दातीर आणि अभिषेक अशी दोघांची नावं आहे. या घटनेनंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
नक्की वाचा - Jalna News: मैदानातला वाद, गळ्यापर्यंत पोहचला! दुसरीच्या मुलाचा गळा तिसरीच्या मुलाने आवळला
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज आणि अभिषेक ट्रेकिंग करून परतत होते. यादरम्यान नाशिकच्या त्र्यंबक रोड येथे झालेल्या भीषण अपघातात या दोघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील बेंझे फाटा येथून नाशिक रोडकडे येताना याची कार भरधाव वेगात होती. त्यादरम्यान कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने मंगळवारी रात्रीच्या सुमारास मोठा अपघात झाला. या अपघातात कारची दुभाजकाला धडक बसली. यानंतर कार चार ते पाच वेळा पलटली आणि थेट 25 फुटांवर फेकली गेली. यामध्ये कारचा अक्षरश: चक्काचुर झाला असून पंकज दातीर आणि अभिषेक हे दोघे मित्र अपघातात जागीच ठार झाले आहेत.
या दोघा मित्रांना ट्रेकिंगची आवड असल्याने दोघेही ट्रेकिंगसाठी त्र्यंबकेश्वर येथे हरिहर किल्ल्यावर गेल्याची माहिती मिळाली आहे. ट्रेकिंग झाल्यानंतर खाजगी कामानिमित्त त्रंबकेश्वर येथे गेले होते. परतत असताना वळत असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चालक कार भरधाव वेगाने चालवित होता, यातूनच हा अपघात झाल्याची शक्यता आहे.