Nashik News: नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु

एकदा गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या गोदावरी घाटापरिसर पाण्याने वेढला असून आसपासची मंदिरेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Rain News:  नाशिक जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची कृपा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा 68 टक्क्यांवर गेला असून 9 धरणांमधून सध्या विसर्ग सुरु आहे. दुसरीकडे गोदावरीची पाणी पातळी वाढल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

Heavy rain in kokan : कोकणाला पावसाने झोडपलं, आजही दोन जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

गेल्या महिनाभरापासून नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये गोदावरी नदीला पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर विसर्गही वाढवण्यात आलेला होता. आता पुन्हा एकदा गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सध्या गोदावरी घाटापरिसर पाण्याने वेढला असून आसपासची मंदिरेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. 

या दमदार पावसामुळे नाशिक जिल्ह्यांमधील धरणसाठा 68 टक्क्यांवर गेला आहे. गेल्यावर्षी याच तारखेला या धरणांमध्ये फक्त 9 टक्के इतका पाणीसाठा होता. यंदा मात्र धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या जिल्ह्यातील भाम, भावली, वालदेवी, केळझर आणि भोजापूर धरण 100 टक्के भरले आहे. तसेच  9 धरणांमधून विसर्ग सुरु असून आहे. याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Mumbai News: अदृश्य शक्तीचा भास झाल्याने समुद्रात उडी; बुडणाऱ्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले!

कोणत्या धरणामधून किती क्युसेकचा विसर्ग?

दारणा - 8580 क्सुसेक
गंगापूर - 4656 क्सुसेक
पालखेड -  1324 क्सुसेक
पुणेगाव - 100 क्सुसेक
भोजापूर  - 38 क्सुसेक
भावली - 701 क्सुसेक
भाम - 3076 क्सुसेक
वाकी - 505 क्सुसेक
वालदेवी - 65 क्सुसेक
 

Advertisement