
Mumbai News : 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असं मुंबई पोलिसांचं बोधवाक्य आहे. या आपल्या कर्तव्याला जागत जीवाची पर्वा न करत एका पोलीस कर्मचाऱ्याने समुद्रात बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवलं आहे. वांद्रे बँडस्टँड येथे ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँडस्टँड, वांदेरा येथे एका 53 वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसली. प्रसंगावधान राखत देवडे यांनी धावत जाऊन पाण्यात उडी मारली व त्या महिलेस पाण्याबाहेर काढले.
(नक्की वाचा- Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)
बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत… pic.twitter.com/bzTSs4mNSJ
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) July 3, 2025
समुद्राचे पाणी नाकातोंडात गेल्याने महिला अर्धवट शुद्धीवर होती. महिलेला तातडीने उपचाराकरिता भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून नातेवाईकांना कळवण्यात आले आहे.
(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)
तर दुसरीकडे साईनाथ देवडे यांनी दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडवर साईनाथ देवडे यांचा फोटो टाकत घडलेली घटना शेअर केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world