नाशिक: देवतारी त्याला कोण मारी म्हणतात! असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण गाव हादरुन गेले आहे. ज्या मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती तोच व्यक्ती अखेरच्या क्षणी जिवंत झाला अन् सगळेच थक्क झाले. या अजब प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. काय आहे हे नेमके प्रकरण? वाचा...
नाशिकमध्ये एक धक्कादायक आणि तितकीच हृदयस्पर्शी घटना घडली आहे, ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका १९ वर्षीय तरुणाला 'ब्रेन डेड' म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, त्याच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना, तो अचानक हालचाल करू लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
Pune News : गणेश विसर्जन पूर्वसंध्येला पुणे हादरलं; नाना पेठेत गँगवॉर, कुख्यात आरोपीच्या मुलाचा खून
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रहिवासी भाऊ लचके (१९) यांचा अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना नाशिकच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्या केल्यानंतर, रुग्णालय प्रशासनाने त्याला 'ब्रेन डेड' म्हणून घोषित केले. मात्र, नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या वैद्यकीय शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला आणि केवळ 'डेड' (मृत्यू) असे समजून त्याला अंत्यसंस्कारासाठी घरी नेले.
घरी आल्यानंतर अंत्यविधीची तयारी सुरू असताना भाऊ लचके अचानक हालचाल करू लागला. यामुळे क्षणभर सर्वजण गोंधळात पडले. परंतु, नंतर त्याला पुन्हा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले की, तो ब्रेन डेड नाही. दरम्यान, मेडिकल कॉलेज प्रशासनाने रुग्णाला खाजगी रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगून घेऊन गेल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या लचके यांची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.