जाहिरात

Mhada Nashik Lottery: म्हाडाकडून खुशखबर! नाशिक मंडळातर्फे 478 घरांसाठी सोडत जाहीर; कधी कराल अर्ज? वाचा डिटेल्स

या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले आहे.

Mhada Nashik Lottery: म्हाडाकडून खुशखबर! नाशिक मंडळातर्फे 478 घरांसाठी सोडत जाहीर; कधी कराल अर्ज? वाचा डिटेल्स

Nashik Mhada Lottery: गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) नाशिक मंडळातर्फे नाशिक शहर परिसरातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते मुंबईतील म्हाडा मुख्यालयातून 'गो-लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ही सोडत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक असेल, असे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले आहे.

MHADA Home : मुंबईतील म्हाडाचं घर पडलं 1.46 कोटींना; स्वस्त दराचं प्रलोभन पडलं महागात!

त्यांनी नागरिकांना कोणत्याही मध्यस्थाच्या मदतीशिवाय, थेट म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट किंवा ॲपवरून अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. म्हाडाने विकसित केलेली IHLMS 2.0 ही प्रणाली अत्यंत सोपी आणि सुरक्षित आहे. त्यामुळे फसवणुकीची शक्यता नाही. या सदनिका अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत. नाशिक मंडळाची ही या वर्षातील तिसरी सोडत असून, यापूर्वी ३७९ सदनिका, १०५ दुकाने आणि ३२ भूखंडांचे यशस्वी वितरण मंडळाने केले आहे.

अर्जाची मुदत आणि प्रक्रिया:

ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरुवात: ०४ सप्टेंबर, २०२५ दुपारी ०१.०० वाजल्यापासून.

ऑनलाइन अर्ज नोंदणी अंतिम मुदत: ०३ ऑक्टोबर, २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.

अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: ०३ ऑक्टोबर, २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.

ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत: ०३ ऑक्टोबर, २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत.

RTGS/NEFT द्वारे भरणा: ०४ ऑक्टोबर, २०२५ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत.

अंतिम यादी प्रसिद्धी: १७ ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता.

दरम्यान, या सोडतीत गंगापूर शिवार (५०), देवळाली शिवार (२२), पाथर्डी शिवार (६४), म्हसरुळ शिवार (१९६), नाशिक शिवार (१४) आणि आगर टाकळी शिवार (१३२) या ठिकाणी सदनिका उपलब्ध आहेत. इच्छुक अर्जदारांनी कोणत्याही एजंट किंवा सल्लागाराकडून अर्ज न करता, म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करण्याचे आवाहन संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

MHADA News: म्हाडा कोकण मंडळाची स्वस्तातली घरं, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com