Eastern Entry Interchange: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर, पनवेल आणि आसपासच्या परिसराची कनेक्टिव्हिटी जागतिक स्तरावर नेणारे महत्त्वाचे प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वारासाठी उभारण्यात येत असलेला 'ईस्टर्न एंट्री इंटरचेंज' अर्थात 'क्लोव्हर लीप' आकाराचा बहुचर्चित प्रकल्प पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. हा केवळ एक पूल नसून, नवी मुंबईच्या भविष्यातील वाहतूक रचनेचा कणा ठरणार आहे.
'ईस्टर्न एंट्री प्रकल्प ठरणार गेमचेंजर...
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) प्राप्त झालेल्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या निधीतून हे काम पूर्णत्वास नेले जात आहे. पनवेल शहर, खंडेश्वर रेल्वे स्टेशन परिसर, तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) कडून येणाऱ्या कंटेनर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन या इंटरचेंजची रचना करण्यात आली आहे.
Vasai News: वसई विरार पालिकेची धडक कारवाई! डमी रुग्ण पाठवली, डॉ. खान फसले, नेमकं काय घडलं?
फुलपाखराच्या आकाराचे सिग्नल-फ्री उड्डाणपूल आणि जोडणाऱ्या रस्त्यांचे हे जाळे वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी एक अत्याधुनिक उपाय ठरणार आहे. विशेषतः कंटेनर वाहतूक खाडीवरील गाढी नदी ओलांडून थेट विमानतळाच्या पूर्व कार्गो प्रवेशद्वारापर्यंत विनाअडथळा पोहोचेल, अशी याची विशिष्ट रचना आहे. याचबरोबर, उलवे बाजूकडील 'वेस्टर्न एंट्री इंटरचेंज'चे कामही प्रगतीपथावर आहे.
प्रवाशांना होणार फायदा
या इंटरचेंजमुळे 'अटल सेतू' (MTHL) मार्गे मुंबईहून येणारी वाहने थेट विमानतळावर दाखल होऊ शकतील. सिडकोचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी जातीने लक्ष देत आहेत.
( नक्की वाचा : Nagpur News : नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा! पुण्यातील गंभीर प्रकरणात महिलेचा टोकाचा प्रयत्न,प्रकरण काय? )
या उड्डाणपूल आणि उन्नत मार्गांच्या नेटवर्कमुळे शिव-पनवेल महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग आणि अटल सेतू-पाम बीच रोडवरून येणाऱ्या प्रवाशांना पनवेलच्या गर्दीत न अडकता थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे कळंबोली सर्कल, खंडेश्वर आणि पनवेल शहर भागातील वाहनचालकांना सर्वाधिक फायदा मिळणार असून, नवी मुंबईच्या विकासाला निर्णायक गती मिळेल.