जाहिरात

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरुन 'या' 30 शहरांसाठी सेवा; कोणत्या प्रवाशांना फायदा? वाचा...

सुरुवातीच्या काळात दिवसाला २२ असलेल्या विमान फेऱ्यांची संख्या आता थेट ७८ वर पोहोचणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने गुरुवारी दिली.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळावरुन 'या' 30 शहरांसाठी सेवा; कोणत्या प्रवाशांना फायदा? वाचा...

Navi Mumbai Airport News:  नवी मुंबई विमानतळावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अन् मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुंबई विमानतळावरुन 30 शहरांना उड्डाणसेवा सुरु करण्यात येणार आहे. 29 मार्च पासून ही विमानसेवा सुरु होणार असून पहिल्यांदाच या विमानतळावर उन्हाळी वेळापत्रक लागू होणार आहे. कोणती आहेत ती शहरे अन् याचा सर्वाधिक फायदा कोणाला होईल? जाणून घ्या सविस्तर... 

Accident News: कारचालकाचा बेशिस्तपणा! निष्पाप डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; डोक्यावरुन टँकरचं चाक गेलं

नवी मुंबई विमानतळावरुन 30 शहरांना सेवा 

देशाच्या हवाई नकाशावर वेगाने विस्तारणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (NMIA) आपल्या पहिल्या उन्हाळी सत्रासाठी सज्जता झाले आहे. एप्रिल महिन्यापर्यंत या विमानतळावरून ३० नवीन हवाई मार्गांची भर पडणार असून, यामुळे एकूण ४६ देशांतर्गत शहरांशी नवी मुंबई थेट जोडली जाईल. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात दिवसाला २२ असलेल्या विमान फेऱ्यांची संख्या आता थेट ७८ वर पोहोचणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने गुरुवारी दिली.

​गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी लोकार्पण झालेल्या या विमानतळासाठी २९ मार्च ते २४ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात व्यापारी, पर्यटन आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची शहरे नवी मुंबईशी जोडली जातील. साप्ताहिक स्तरावर विमान फेऱ्यांची संख्या १,०९२ इतकी राहण्याचा अंदाज आहे. मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने ही मोठी झेप मानली जात आहे. यामध्ये दिल्ली, गोवा आणि बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश असून प्रवाशांचा वेळ वाचण्यास मोठी मदत होईल.

Mahabaleshwar News: महाबळेश्वर 24 तास अंधारात, स्थानिकांसह पर्यटकांचे हाल! भीषण वास्तव समोर, नेमकं काय घडलं?

नवी मुंबई विमानतळावरुन सेवा सुरु होणाऱ्या या 30 शहरांमध्ये राजकोट , हुबळी, जबलपूर, भावनगर, भोपाळ, तिरुवनंतपुरम, औरंगाबाद, अयोध्या, बागडोगरा, बरेली, आग्रा, बेळगाव, दिऊ, दुर्गापूर, गोवा, गोरखपूर, हिंडन  आणि विशाखापट्टणम, चंदीगड, डेहराडून, जम्मू, झारसुगुडा, कन्नूर, श्रीनगर, तिरुपती, कोल्हापूर, मदुराई, कोलकाता, पटना, रायपूर यांचा समावेश आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com