Navi Mumbai Crime : विवाहितेकडे लग्नाची मागणी; नकार दिल्याच्या रागात पतीलाच संपवलं!

नवी मुंबईतील वाशी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल कांबळे, प्रतिनिधी

नवी मुंबईतील वाशी परिसरात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 25 वर्षीय विवाहित महिलेनं लग्नास नकार दिल्याच्या रागातून तिच्या पतीचा खून करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी फातीमा आबुबकर मंडल (वय 25), या वाशी गावातील केरळा हाऊस समोरील झोपडपट्टीत राहत असून घरकाम करून आपला संसार चालवत होत्या. त्यांच्या पतीचे नाव आबुबकर सुहादअली मंडल (वय 35) असे आहे. ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा घरी परतले नाहीत. त्यांची कसून शोधाशोध केली असता, कुठेही काही माहिती मिळाली नाही.

यानंतर फिर्यादीने वाशी पोलीस ठाण्यात हजेरी लावून आपली कैफियत मांडली. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असता एक गंभीर बाब समोर आली. आरोपी अमीनुर अली अहमद अली मौल्ला (वय अंदाजे 21) याने फिर्यादी फातीमालाकडे लग्नासाठी वारंवार तगादा लावला होता. मात्र, फातीमाने स्पष्ट नकार दिला. हा नकार अमीनुरला सहन न झाल्याने त्याने संतापाच्या भरात तिच्या पतीचा खून केला, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

नक्की वाचा - Mumbai News: मुंबईतील शिक्षिकेवर बलात्काराचा आरोप, विद्यार्थी'प्रेमी' महिलेला जामीन मंजूर

खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी लपवून ठेवला. इतकंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत पतीचे कपडे व इतर वस्तू पनवेल-सायन रोडवरील वाशी गाव अंडरपास रोडजवळील खाडीमध्ये फेकून दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक व्हॅन, वरिष्ठ पोलीस अधिकारी, गुन्हे अन्वेषण पथक आणि स्थानिक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला.

Advertisement

नवी मुंबई पोलिसांची अधिकृत प्रतिक्रिया

या प्रकरणात तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी माहिती दिली की, “फिर्यादीने केलेल्या तक्रारीनुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला आहे. आरोपीने लग्नास नकार दिल्याचा राग मनात ठेवून खून केल्याची शक्यता असून, आम्ही सर्व शक्यता गृहित धरून तपास करत आहोत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.” या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ हे तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन मार्गदर्शन केलं असून, पोलिसांची तपासाची गती वाढवण्यात आली आहे.

Topics mentioned in this article