- नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट 25 दिसंबर से कमर्शियल ऑपरेशन शुरू कर देगा
- एयरपोर्ट टर्मिनल पर यात्रियों को 10 Mbps तक की हाई-स्पीड फ्री Wi-Fi सेवा उपलब्ध कराई जाएगी
- अदाणी वन ऐप के जरिए यात्रियों को रीयल-टाइम फ्लाइट स्टेटस और बोर्डिंग गेट की जानकारी मोबाइल पर मिलेगी
Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (NMIA) केवळ विमान उड्डाणांच्या बाबतीत मुंबईवरील भार कमी होणार नाहीय तर प्रवाशांना हायटेक अनुभव देण्यासाठीही विमानतळ प्रशासन सज्ज आहे. 25 डिसेंबरपासून विमानतळावरील कमर्शिअल ऑपरेशन सुरू होणार आहे आणि 'डिजिटल-फर्स्ट' सुविधा हे या विमानतळाचे वैशिष्ट्य असणार आहे.
हाय-स्पीड फ्री Wi-Fi
एयरपोर्ट टर्मिनलवर प्रवाशांना 10 Mbps पर्यंत हाय स्पीड फ्री Wi-Fi सुविधा मिळेल. ही नेटवर्क सुविधा इतकी मजबूत असेल की गर्दीच्या वेळेसही प्रवासी व्हिडीओ कॉल, स्ट्रीमिंग, डिजिटल पेमेंट आणि कॅब बुकिंग सहजपणे करू शकतील.
तुमचा फोनच असेल व्हर्च्युअल असिस्टंट
एखादी माहिती विचारण्यासाठी आता तुम्हाला काउंटरवर जाऊन लांब रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. अदाणी वन अॅपच्या (Adani OneApp) माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या मोबाइल फोनद्वारे थेट
- विमानाच्या उड्डाणाची माहिती
- बोर्डिंग गेट संदर्भातील माहिती
- विमान उड्डाणाचे वेळापत्रक यासह अन्य महत्त्वाच्या अपडेट्स मिळतील.
मेड इन इंडिया कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी विमानतळाने सरकारी टेलीकॉम कंपनी BSNLशी हातमिळवणी केलीय. विशेष म्हणजे येथे वापरण्यात येणारी पायाभूत सुविधा पूर्णपणे स्वदेशी म्हणजे भारतीय बनावटीची आहे, जी 4G आणि 5G सेवांना सपोर्ट करते.
शॉपिंग आणि खाण्यापिण्याचीही सुविधा
अदाणी वन अॅपच्या माध्यमातून प्रवासी विमान उड्डाणाची माहिती ट्रॅक करण्याव्यतिरिक्त विमानतळावरील फुड आउटलेट्स, रिटेल स्टोअर्स आणि लाउंजशी संबंधित माहिती देखील मिळवू शकणार आहे. याद्वारे प्रवाशांना टर्मिनल परिसरात असताना त्यांच्या वेळेचे नियोजन करण्यास मदत होईल
19,650 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या ग्रीनफील्ड विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी 2 कोटी प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. भविष्यात ही क्षमता दरवर्षी 9 कोटी प्रवाशांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. 25 डिसेंबर 2025पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासन तुमचा प्रवास केवळ आरामदायीच नव्हे तर पूर्णपणे डिजिटल पद्धतीने करण्यासाठीही सज्ज आहे.
(Disclaimer: New Delhi Television is a subsidiary of AMG Media Networks Limited, an Adani Group Company.)
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)