जाहिरात

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष शिगेला! शिवसेनेकडून मोठी घोषणा, थेट अभियान सुरु...

शिवसेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी गणेश नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत 'पोलखोल' अभियानाची घोषणा केली आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष शिगेला! शिवसेनेकडून मोठी घोषणा, थेट अभियान सुरु...

Eknath Shinde Vs Ganesh Naik:  भारतीय जनता पक्षाचे नेते, वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा संघर्ष चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. गणेश नाईक यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यावर वारंवार निशाणा साधला जात आहे. अशातच आता शिं गटानेही गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधत थेट भ्रष्टाचार प्रकरणाची पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. 

एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष पेटणार

नवी मुंबईत भाजप नेते आणि मंत्री गणेश नाईक विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा थेट संघर्ष पेटला आहे. शिवसेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम यांनी गणेश नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत 'पोलखोल' अभियानाची घोषणा केली आहे. यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 

Ajit Pawar: अजित पवारांच्या 'त्या' प्रकरणात मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, उच्च स्तरीय चौकशी होणार

वनमंत्री गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची शिंदेंच्या शिवसेनकडून पोलखोल केली जाणार आहे. यासोबतच गणेश नाईक यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही करण्यात आली आहे. स्मृतीभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांचा मोफत उपचार करुन मिळेल असा टोला या बॅनरमध्ये लगावण्यात आला आहे. त्याचबरोबर अंकुश कदम यांनी वनमंत्री गणेश  नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचेही आरोप केले आहेत. 

शिंदेसेना करणार भ्रष्टाचाराची पोलखोल 

त्याचबरोबर मंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेचा पैसा स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे खर्च केला आहे. बालाजी गार्डन ते त्यांच्या 'व्हाईट हाऊस' या निवासस्थानापर्यंत बांधलेला पूल नक्की कोणाच्या फायद्यासाठी आहे? स्वतःच्या की जनतेच्या? याचे उत्तर गणेश नाईक यांनी द्यावे.  "मंत्रिपद चाटायचे आहे का?" असे म्हणणाऱ्या "नाईकांनी स्वतः नवी मुंबईला चाटून-पुसून खाल्ले आहे  एमआयडीसीच्या भूखंडावर स्वतःचे कार्यालय थाटले आणि घरापर्यंत येण्यासाठी जनतेच्या पैशातून पूल बांधला, हेच तुमचे कर्तृत्व का?" असा सवालही त्यांनी केला आहे. 

Beed Crime: महाराष्ट्रात चाललंय काय? 30 जण घरात घुसले, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारलं, 3 महिला जखमी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com