Nashik Ashok Kharat Case: नाशिकचा अत्याचारी बाबा कॅप्टन अशोक खरातची संगत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलीच महागात पडली आहे. अशोक खरात प्रकरणात कनेक्शन समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाची चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर आता त्यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आल्याची माहिती समोर आली असून सुनेत्रा पवार लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रुपाली चाकणकरांची उचलबांगडी होणार..?
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढावे असा विचार सुरु आहे. राष्ट्रवादीच्य राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रुपाली चाकणकर यांच्यावर नाराज असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार या रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदावरुन उचलबांगडी करण्याची शक्यता आहे.
Ranjangaon MIDC: रांजणगाव एमआयडीसीत खळबळ! कामगारांचे 'पलायन'; उद्योगांना घरघर, नेमकं काय घडलं?
महत्त्वाचं म्हणजे रुपाली चाकणकर यांना प्रदेशअध्यक्षा पदावरुन काढण्यात यावे यासाठी पक्षामध्ये दबाव आहे. चाकणकरांना पदावरुन हटवण्यात यावे यावरुन पक्षातच मतभेद असल्याचेही समोर आले आहे. चाकणकर पदावरून काढा अशी मागणी पक्षांमधील काही नेत्यांची आहे. मात्र पक्षातील एक ज्येष्ठ नेता चाकणकर कारवाई करू नये यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार घेणार मोठा निर्णय?
दरम्यान, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी पाठवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मला प्राप्त झाला आहे. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून मी त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवत आहे, असं ट्वीट त्यांनी केले आहे.
Sunil Tatkare: अशोक खरात प्रकरण तटकरेंनाही भोवणार; चाकणकरांप्रमाणे फोटो व्हायरल झाल्याने अडचणीत?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world